Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: हडफडे येथे दीड लाखांचा गांजा जप्त, हणजूण पोलिसांची कारवाई

गोव्यात सध्या ड्रग्ज, गांजा यांची विक्री करण्याच्या घटना घडत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात सध्या ड्रग्ज, गांजा यांची विक्री करण्याच्या घटना घडत असून गोवा पोलीस आणि अबकारी विभाग याबाबत सतर्क झाला आहे, पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोज नवनवीन घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना आज हडफडे येथे घडली आहे.

हणजूण पोलिसांनी हडफडे येथे छापा टाकून दीड लाखांचा दीड किलो गांजा जप्त केल्याची घटना आहे. याप्रकरणी संशयित अरविंद चव्हाण (वय ३६, रा. गौरवाडा, कळंगुट) याला ताब्यात घेऊन अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

गोव्यात अवैध व्यवसाय सर्रास सुरु असून अनेकदा ड्रग्स सारख्या अमली पदार्थ जप्त केल्याच्या घटनाही घडत आहे. यात स्थानिकांसोबत परप्रांतीयदेखील सहभागी असल्याचे निदर्शनास आलेय.

गोव्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग्स व्यवसायाशी अनेकदा संबंध प्रस्थापित झालाय. असे व्यवहार पूर्णत: उखडून काढण्यासाठी राष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी विभागाबरोबर शेजारील राज्यांशी समन्वयाची आवश्‍यकता आहे. तरच असे व्यवहार करणाऱ्या टोळीपर्यंत पोहोचता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: प्रेम, व्यवसायात शुभ योग! कसा असेल पुढचा आठवडा? जाणून घ्या..

Kudnem: कौंडिण्य ऋषींच्या नावाचा अपभ्रंश होऊन झालेले 'कुडणे', लुकलुकणाऱ्या काजव्यांची जत्रा भरून प्रकाशित होणारे मंदिर

Goa Cricket: ..आणखी एक 'क्रिकेटर' सोडणार होती गोवा! संघटनेची शिष्टाई सफल; सराव शिबिरास सुरवात

Goa Live News: नंबर प्लेट काढून धिंगाणा घालणाऱ्या दोन कार कार मालकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Goa Crime: दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, राजस्थानच्या आरोपीने केले अज्ञातस्थळी बंदिस्त; वाचा एकूण प्रकार

SCROLL FOR NEXT