Goa Congress : भाजपविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन तीव्र करणार!

कॉंग्रेस : वास्कोत सत्याग्रह; सरकारवर टीकेची झोड
Goa Congress Sanklp Yatraa
Goa Congress Sanklp YatraaDainik Gomantak
Published on
Updated on

हुकूमशाही पद्धतीने राज्य करणाऱ्या भ्रष्टाचारी जुमला पार्टीने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अन्याय केला आहे. मोदी सरकारने लोकशाही विरोधात जाऊन, षडयंत्र रचून त्यांना खासदार पदावरून अपात्र केले. या अन्यायाविरुद्ध अखिल भारतीय काँग्रेस समिती राष्ट्रव्यापी आंदोलन छेडणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

राहुल गांधी यांच्या बडतर्फीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे मुरगाव पालिका इमारतीसमोर संकल्प सत्याग्रह आंदोलन केले.

Goa Congress Sanklp Yatraa
Panaji Smart City: अरे... आम्ही तुम्हाला मते दिली, कंत्राटदारांना नाही; पणजीतील कामांवरुन उद्योजक संतापले

यावेळी पाटकर यांच्यासह माजी आमदार कार्लुस आल्मेदा, उपाध्यक्ष सुनील कवठणकर, सुभाष फळदेसाई, सरचिटणीस कॅप्टन विरीएतो फर्नांडिस, ओलेन्सियो सिमॉईश, दक्षिण गोवा काँग्रेस अध्यक्ष सावियो डिसोझा, गोवा महिला कॉंग्रेस अध्यक्ष बीना नाईक, माजी नगराध्यक्ष नितीन चोपडेकर, उलारिको रॉड्रिग्स, सुचिता शिरोडकर, माजी उपनगराध्यक्षा शांती मांद्रेकर, मुरगाव काँग्रेस गटाध्यक्षा योगिता पार्सेकर, वास्को काँग्रेस गटाध्यक्ष ॲड. मेलविन फर्नांडिस, वसंत नाईक, पीटर डिसोझा, चिखलीचे पंच फ्रान्सिस नुनीस, नगरसेवक मथायस मोन्तेरो, जेनिफर आल्मेदा, राजेश स्वामी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Goa Congress Sanklp Yatraa
Bicholim News : आकर्षण रानमेव्याचे...जांभूळ, चुरने बाजारात

लोकसभेत दक्षिण गोवा कॉंग्रेसकडेच

कार्लुस आल्मेदा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाही पद्धतीने राजकारण करत आहेत. त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत जनता योग्य जागा दाखवेल.

गोव्यात भाजप सरकारने मोदींच्या इशाऱ्यावरून अदानी ग्रुपचा कोळसा मुरगाव बंदरात तीन पटींनी वाढवला. त्यामुळे मुरगाव तालुका प्रदूषणाच्या विळख्यात गुरफटला आहे.

सरकार हुकूमशाही पद्धतीने कोळसा आयात करण्यासाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करत आहे. मुरगावात पुन्हा कॉंग्रेस पक्ष बळकट होऊन, लोकसभा निवडणुकीत दक्षिणेत कॉंग्रेसला बहुमत मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com