Gangwar in Goa Dainik Gomantak
गोवा

Gangwar in Goa: दोन वर्षांपूर्वी मडगाव शहरही थरारले होते टोळीयुद्धाने! गुंड अन्‍वरवर प्राणघातक हल्ला

पायाला गोळी लागूनही जीव वाचवण्‍यासाठी धावत होता, मागे हातात नंग्या तलवारी घेऊन पाचजण करत होते पाठलाग

दैनिक गोमन्तक

सुशांत कुंकळयेकर

पायाला गोळी लागलेली असताना आपला जीव वाचविण्‍यासाठी धावणारा गुंड आणि नंग्‍या तलवारी घेऊन त्‍याचा पाठलाग करणारे आणखी पाचजण. अगदी सिनेमात शोभावे असे हे दृष्‍य दोन वर्षांपूर्वी फातोर्डा येथील लोकांनी आपल्‍या डोळ्‍यांनी पाहिले. भरदुपारी भरवस्‍तीत झालेल्‍या या गँगवारच्‍या आठवणी लोक अजूनही विसरलेले नाहीत.

१६ फेब्रुवारी २०२१ रोजी फातोर्ड्यातील लोकांनी हा भयानक प्रकार आपल्‍या डोळ्‍यांनी पाहिला. कुख्‍यात गुंड शेख अन्‍वर ऊर्फ टायगर याच्‍यावर विरोधी गटाने हा हल्‍ला केला होता. गोव्‍यात त्‍यावेळी चालू असलेल्‍या वाळूतस्‍करीतील दुश्‍‍मनी त्‍यामागे असल्‍याचे सांगितले जात होते. या प्रकरणात नंतर फातोर्डा पोलिसांनी रिकी वर्णेकर, इम्रान बेपारी आणि अन्‍य गुंडांना अटक केली होती. दुपारी सव्‍वाएकच्‍या सुमारास ही थरारक घटना घडली होती.

गुंड अन्‍वर याला ठार मारण्‍यासाठी भरदिवसा हा हल्‍ला करण्‍यात आला होता. त्‍याचा खात्‍मा करण्‍यासाठीच हे बुरखाधारी गुंड रस्‍त्‍यावर उतरले होते. त्‍यांच्‍या हातात तलवारी, लोखंडी सळ्‍या, सुरे अशी घातक शस्‍त्रे होती. त्‍यातील एकाने जीव घेऊन पळणाऱ्या अन्‍वरवर गावठी कट्ट्याने गोळी झाडल्‍याने तो जबर जखमी झाला होता.

मात्र अन्‍वरच्‍या चांगल्‍या नशिबाने त्‍याचवेळी तेथून पोलिसांचे वाहन जात असल्‍यामुळे मारेकऱ्यांनी त्‍याचा पाठलाग सोडून दिला होता. निवृत्त पोलिस अधीक्षक सॅमी तावारीस यांनी त्‍यावेळी आपला जीव धोक्‍यात घालून यातील एका गुंडाला अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: 15 फेब्रुवारीपासून 'या' 3 राशींवर होणार धनवर्षा, ग्रहांच्या राजकुमाराची बदलणार चाल; संपणार घरातील कटकटी

Kushavati: गोव्यातला महाकाय भग्न नंदी, शिवालयाचे भग्नावशेष, शेकडो वर्षांच्या इतिहासाचा कोट; 'कुशावती' नदीकाठी वसलेली संस्कृती

इम्रान खान यांचं समर्थन करणं पडलं महागात! पाकिस्तानात 4 पत्रकारांसह 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा; सोशल मीडिया पोस्ट ठरली गुन्हा

Viral Video: रात्रीचं दाट धुकं अन् समोरचं काहीच दिसेना, ड्रायव्हरनं लढवली अशी शक्कल की तुम्हीही म्हणाल 'नादच खुळा'! पाहा व्हिडिओ

Assonora Accident: अस्नोडा येथे बस आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT