Zenito Cardozo Dainik Gomantak
गोवा

Zenito Cardozo Case: शिरदोन गँगवॉर प्रकरण! जेनिटोला ‘सुप्रीम’ दिलासा; 3 वर्षांच्या शिक्षेला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

Goa Crime: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्‍याला ठोठावलेली तीन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाच्या अंमलबजावणीस पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: शिरदोन गँगवॉर प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेला जेनिटो कार्दोज याला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम दिलासा दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्‍याला ठोठावलेली तीन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाच्या अंमलबजावणीस पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.

म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विजय पोल यांनी २९ जुलै २०१६ रोजी जेनिटोला दोषी ठरवत तीन वर्षांची सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत असा आदेश दिला होता. उच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला आणि जेनिटोला १० नोव्हेंबरपर्यंत आत्मसमर्पणाचे निर्देश दिले होते. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. जेनिटोच्‍या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी, आत्माराम नाडकर्णी आणि मायकल नाझारेथ यांनी बाजू मांडली.

प्रकरणाची पार्श्वभूमी

१० मे २००९ रोजी शिरदोण किनाऱ्यावरील ‘अ‍ॅनास्टेशिया बीच शॅक’ येथे झालेल्या हिंसक झटापटीत संतोष काळे आणि जॉनी फर्नांडिस या दोघांचा मृत्यू झाला होता. तर, फ्रान्सिस डिसोझा (मिरांडा) हा गंभीर जखमी झाला होता. जेनिटो देखील जखमी झाला होता. त्याने ‘स्वसंरक्षणासाठी कृती केली’ असा दावा केला होता. तथापि, न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत त्याच्यावर भारतीय न्‍यायदंड संहितेच्‍या ३०४ (भाग २) आणि ३२६ कलमांखाली आरोप निश्‍चित केला होता.

सध्या वास्‍तव्‍य कोलवाळ तुरुंगात

जेनिटो कार्दोज सध्या कोलवाळ तुरुंगात आहे. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्‍यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणात अटक झालेल्या आठ संशयितांपैकी तो एक आहे. त्याने या प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र सत्र न्यायालयाने तो फेटाळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: खाऊसाठी दोन खारुताईंमध्ये गोड मारामारी; ये व्हिडिओ आपका दिन बना देगा Watch

Chorla Ghat Update: गोवा–कर्नाटक रस्ता धोकादायक! चोर्ला घाटात खड्ड्यांचे साम्राज्य; कणकुंबी मार्गाने प्रवास करणे ठरतेय जीवघेणे

VIDEO: 6,6,6,6,6,6... एका षटकात 38 धावा, 12 चेंडूत ठोकलं अर्धशतक, आफ्रिदीची तुफान फटकेबाजी; पाहा व्हिडिओ

Karachi Art Council: पाकिस्तानमध्ये बांगलादेशी, हिंदू कलाकारांची धूम! 18 वर्षांनंतर गाजवले स्टेज; कराची महोत्सवात 140 देशांचा सहभाग

Valvanti River: सजवलेल्या 30 नौका, दिव्यांची रोषणाई; विठ्ठलापुरात 'त्रिपुरारी' पौर्णिमेचा जल्लोष

SCROLL FOR NEXT