Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: सराईत गुंड सूर्यावर चॉपर, सुरीने हल्ला

Goa Crime News: टोळी युद्ध : टोंक-करंझाळे येथे साधला डाव

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: सराईत गुंड सूर्यकात कांबळी ऊर्फ सूर्या (५५) याच्यावर पूर्ववैमनस्यातून दोघा बुरखाधारी हल्लेखोरांनी चॉपर व सुरीने प्राणघातक हल्ला करून पोबारा केला.

टोंक-करंझाळे येथे घडलेल्‍या या हल्ल्यात सूर्या गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

विविध पोलिस स्थानकांत त्याच्यावर 8 गुन्हे नोंद आहेत. त्याची प्रकृती सुधारत असल्‍याची माहिती पोलिसांनी दिली. शंकरवाडी-ताळगाव येथे आपल्‍या कुटुंबासोबत राहत असलेला सूर्या हा अट्टल गुंड आहे.

त्याच्याविरोधात जीवे मारण्याची धमकी देणे, मारहाण करणे तसेच शस्त्रे बाळगण्याचे गुन्हे आहेत.

पणजी, पेडणे, डिचोली व कळंगुट पोलिसांत हे गुन्‍हे नोंद असून सध्या तो सशर्त जामिनावर आहे. त्याच्या चेहऱ्यावर सुरीने वार केल्‍याने अनेक जखमा झाल्या असून, डॉक्टरांनी त्यावर टाके घातले आहेत.

बार अँड रेस्टॉरंटच्‍या बाहेर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या सूर्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तसेच १०८ रुग्णवाहिका बोलावून त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले.

घटनास्थळी सूर्याने हल्लेखोराच्या हातातून हिसकावून घेतलेला चॉपर पडला होता, तो पोलिसांनी ताब्‍यात घेतला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्‍या साहाय्‍याने पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. त्‍यांना काही धागेदोरे सापडले आहेत.

दारू पिण्‍यासाठी एकटाच आला अन्‌

  • सूर्याचे इतर गुन्हेगारांशी वैर होते. विरोधी गटातील गुंड त्याचा काटा काढण्याची संधी शोधत होते.

  • सूर्या नेहमी आपल्याबरोबर आणखी दोन-तीन साथीदारांना घेऊन फिरत असे.

  • सूर्या दररोज रात्री दारू पिण्यासाठी करंझाळे येथील ‘फर्न’ बार अँड रेस्टॉरंटमध्‍ये जात असे.

  • रात्री दहाच्या सुमारास तो दारू पिऊन बाहेर आला असता बुरखा घातलेल्‍या दोघा युवकांनी त्‍याच्‍यावर सुरी व चॉपरने हल्ला चढवला.

  • सूर्याने हल्लेखोराच्या हातातील चॉपर हिसकावून घेतला. त्यामुळे त्याच्या हाताला गंभीर जखमा झाल्या.

  • दुसऱ्या हल्लेखोराने सूर्याच्‍या चेहऱ्यावर सुरीने वार केले. त्‍यानंतर दोघेही हल्लेखोर धावत पसार झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Goa Live News: "POGO विधेयक एक दिवस विधानसभेत मंजूर होईल" मनोज

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

SCROLL FOR NEXT