Manohar Parrikar: पुस्‍तक वाचताना कळले, आजोबा संरक्षणमंत्री होते; नातू ध्रुव भारावला

Manohar Parrikar: पुस्‍तक वाचताना कळले, आजोबा संरक्षणमंत्री होते; नातू ध्रुव भारावला
Manohar Parrikar
Manohar ParrikarDainik Gomantak

योगेश मिराशी

Manohar Parrikar: दिवंगत मनोहर पर्रीकर म्हणजे समस्‍त गोवेकरांचे ‘भाई’ आणि देशवासीयांचे लाडके नेते होते. धडाडी आणि जनहिताची दूरदृष्‍टी असलेल्‍या व अमिट कार्याने लोकनेता बनलेल्‍या पर्रीकरांचा नातू ध्रुव याच्‍यावर प्रचंड जीव होता.

Manohar Parrikar
Goa Sunburn 2023: ध्वनिप्रदूषण मुळीच नको; न्‍यायालयाचा आदेश

सध्या ध्रुव इयत्ता चौथीमध्ये शिकतोय. दहा दिवसांपूर्वीच ‘सामान्य ज्ञान’ विषयाचे पुस्‍तक वाचताना ‘आपले आजोबा देशाचे संरक्षणमंत्री होते’, ही गोष्ट ध्रुवला समजली आणि तो कमालीचा भारावला. पुस्तकातील माहिती त्‍याच्‍यासाठी ‘सरप्राईज’ ठरली.

(स्‍व.) माजी संरक्षणमंत्री तथा मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्‍या जयंतीनिमित्त (ता. 13डिसेंबर) ‘गोमन्‍तक’ने त्‍यांचे पुत्र उत्‍पल यांच्‍याशी संवाद साधला. यावेळी भाईंच्‍या आठवणींचा हळवा कप्‍पा अलगद उलगडत गेला. ‘भाईंचे देहावसान होऊन साडेचार वर्षे लोटली; परंतु कार्यरूपी पाऊलखुणा चिरंजीवी आहेत. लौकीकअर्थाने भाईंचे अस्‍तित्‍व कायम असले तरीही कुटुंबाचे

Manohar Parrikar
Goa Beach: बुडणाऱ्या 13 पर्यटकांना दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांकडून जीवदान, 2 परदेशी नागरिकांचा समावेश

आधारवड म्‍हणून त्‍यांची उणीव पावलोपावली जाणवते. अडचणींच्‍या प्रसंगी भाईंचा मला नेहमीच मोठा आधार राहिला.

हक्काचा वडीलधारी माणूस गेल्याने आधारस्तंभ हरवला. त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही’, असे सांगताना उत्‍पल गहिवरले. ‘दोन दिवसांपूर्वी माझ्या मुलाचा घरगुती पद्धतीने वाढदिन साजरा झाला, तेव्‍हा भाईंची (बाबांची) त्यादिवशी प्रचंड आठवण व उणीव भासली’, असेही उत्पल म्हणाले.

योग्‍य वेळी बोलेन...

राजकीय स्थितीबाबत विचारले असता उत्पल यांनी भाष्‍य करण्‍याचे टाळले. ‘सद्यःस्थितीत मला काहीच बोलायचे नसून, लोक सगळ्या गोष्टी बघताहेत. तुम्ही पुन्हा भाजपत जाणार का? असे विचारले असता उत्पल यांनी प्रतिसाद दिला नाही. ‘योग्य वेळी मी बोलेन’, असे ते पुढे म्हणाले.

भाई होते माझे मोठे आधारस्तंभ

मनुष्य कितीही मोठा झाला, आयुष्यात स्‍थिर झाला तरीही कठीणप्रसंगी एका वडीलधाऱ्या व्‍यक्‍तीची गरज भासतेच. जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग आले तेव्हा भाई माझ्‍यासोबत होते. आज ते आमच्यासोबत नाहीत ही बाब पटणारी नसली तरी ते कटूसत्य आहे. भाई हे आपला आधारस्तंभ होते व त्यांचा माझ्या पाठीवरील हात मोठ्या अडचणींना भिडण्‍याची ताकद द्यायचा, असे उत्‍पल म्‍हणाले.

गोव्यात साधनसुविधांशी निगडित भरीव विकास होत असून, भाईंचे त्‍यात मोठे योगदान व दूरदृष्टी दिसते. मोपा विमानतळापासून ते नवीन आकारास येणाऱ्या झुआरी पुलामुळे गोमंतकीयांना पुढील अनेक दशके लाभ होईल. त्‍याचा मला सार्थ आनंद आहे. - उत्‍पल पर्रीकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com