Three arrested in Mapusa theft case Dainik Gomantak
गोवा

ज्येष्ठांना गंडा घालणारी टोळी म्हापशात जेरबंद

दिल्लीचे ठग : एटीएममध्ये वृद्धांना करायचे ‘लक्ष्य’

दैनिक गोमन्तक

म्हापसा: बनावट तसेच ग्राहकांच्याच एटीएम कार्डचा पिन क्रमांक मिळवून असाहाय्य विशेषत: ज्येष्ठ नागरिकांचे पैसे हडप करणाऱ्या दिल्लीतील चौघाजणांच्या टोळीला म्हापसा पोलिसांनी आज अटक केली. संशयित आरोपींकडून मोठ्या प्रमाणात एटीएम कार्ड तसेच दोन पीओएस मशीन जप्त केले आहे.

(gang of thugs has been arrested in mapusa)

याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अनिल कुमार (36, आनंद महाबीर (26, दोघेही रा. सुल्तानपुरी-दिल्ली), नवीन कुमार (30, रा. दिल्ली, मूळ भिवानी-हरियाणा) आणि राजेश कुमार (35, रा. दिल्ली) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी या संशयितांकडून दोन पीओएस मशीन जप्त केले आहेत. ही टोळी या मशीनच्या माध्यमातून ग्राहकांच्या खात्यातील पैसे स्वाईप करायची. पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक जीवबा दळवी, निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक बाबलो परब, विराज कोरगावकर, आशिष परब, हेड कॉन्स्टेबल आल्विटो डिमेलो, सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल राजेश कांदोळकर, प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, अनिक राठोड आणि लक्ष्मीकांत नाईक यांनी या टोळीला गजाआड केले.

आठजणांना ठगांनी घातला गंडा

ज्या पीडितांच्या खात्यातून हे पैसे दुसऱ्या खात्यात हस्तांतरण केले जायचे, ती बँक खाती पोलिसांनी गोठवल्याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी माध्यमांना दिली. गोव्यातील एकूण आठजण या टोळीचे शिकार झाले आहेत. संशयितांकडून जवळपास ८ मूळ एटीएम कार्ड व इतर ५५ बनावट एटीएम कार्ड जप्त केली आहेत. हे कार्ड ते ग्राहकांच्या मूळ कार्डसोबत अदलाबदल करायचे. यामध्ये एसबीआय, अ‍ॅक्सिस बँक यासारख्या एटीएम कार्डचा समावेश आहे.

मदतीच्या बहाण्याने करायचे लक्ष्य!

म्हापसा पोलिसांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारावर या गुन्ह्यातील टोळीला गजाआड केले. हे संशयित बँकेच्या एटीएममध्ये जाऊन वृद्धांना लक्ष्य करायचे. त्यांना पैसे काढून देण्याकरिता मदत करतो, अशी बोळवण करून त्यांचे पिन क्रमांक मिळवायचे आणि नंतर आपल्याकडील बनावट कार्ड त्यांच्या हातात ठेवायचे. नंतर ते ग्राहकांच्या कार्डमधील पैसे थेट ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरण करायचे.

अनोळखी व्यक्तीची मदत पडली महाग

फिर्यादी मिलिंदी गावडे (रा. सत्तरी) यांनी ३ जून रोजी म्हापसा येथील ‘एसबीआय’च्या एटीएममधून पैसे काढले होते. यावेळी एका इसमाने पैसे काढण्यासाठी त्यांना मदत केली होती. त्या इसमाने पैसे काढून झाल्यानंतर त्याच प्रकारचे समान दुसरे एक एटीएम कार्ड त्यांना परत केले. नंतर या खात्यातून संशयितांनी सुमारे १.५० लाख रुपयांवर डल्ला मारला. याप्रकरणी पोलिसांनी भादंसंच्या ३८० व ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

दागिने लिफाफ्यात काढून ठेवण्यास सांगत

गोवा पोलिसांकडे अलीकडच्या काळात सोनसाखळी व इतर दागिने लंपास करण्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारचे म्हापशात दोन, तर पर्वरीत एक गुन्हा नोंद आहे. तसेच दक्षिण गोव्यातही एक प्रकरण घडले आहे. संशयित हे पोलिस असल्याची बतावणी करून रस्त्यावरील लोकांना दागिने एका लिफाफ्यात काढून सुरक्षित ठेवण्यास सांगतात. याच वेळी हे संशयित दुसरा जड लिफाफा पीडितांच्या हातात देतात आणि पसार होतात. नंतर पीडितांना आपण फसवले गेल्याचे कळते. पोलिसांनी या प्रकरणात समाज माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे नोंदविले आहेत. लोकांनी पोलिस ठाण्यात येऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहनही केले आहे.

अशी होती मोडस् ऑपरेंडी : गेल्या काही दिवसांपासून बँक खात्यातून परस्पर पैसे काढल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. एटीएम कार्डची चोरी झाली नसतानाही एटीएम कार्डद्वारेच हे पैसे काढण्यात येत होते. याप्रकरणी संशयित हे एटीएममध्ये येणाऱ्या विशेषतः वृद्धांना पैसे काढण्यासाठी मदत करतो म्हणून त्यांच्याकडून एटीएम कार्ड घ्यायचे आणि त्यांचा एटीएम पिन क्रमांकही मिळवायचे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Anaya Bangar Viral Video: ट्रान्सजेंडर क्रिकेटर अनाया बांगरचं दमदार कमबॅक, RCB ची किट बॅग घेऊन केली प्रॅक्टिस, WPL मध्ये खेळणार?

प्रभुदेसाईंच्या आंदोलनानंतर कृषी विभागाचे आश्वासन; भातकापणीसाठी देणार नवीन यंत्र

SCROLL FOR NEXT