कार स्टिरिओ चोरट्यांच्या टोळीला वाहनासह बेळगावात शिताफीने अटक  Dainik Gomantak
गोवा

Goa: चोरट्यांच्या टोळीला अखेर बेळगावात अटक

राज्यात अनेक ठिकाणी एकाच रात्री वाहनांतील स्टिरओ चोरून पोलिसांची झोप उडवलेल्या आंतरराज्य टोळीला गोवा पोलिसांनी शिताफीने 24 तासांच्या आत अटक केली.

दैनिक गोमन्तक

पणजी - राज्यात अनेक ठिकाणी एकाच रात्री वाहनांतील स्टिरओ चोरून पोलिसांची झोप उडवलेल्या आंतरराज्य टोळीला गोवा पोलिसांनी शिताफीने 24 तासांच्या आत अटक केली. या टोळीत महाराष्ट्रातील (Maharashtra) तिघा संशयितांकडून सुमारे 15 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे जुबेर रहिस अहमद (31 वर्षे, नालासोपारा - मुंबई), जगन्नाथ रामनाथ सरोज (46 वर्षे, नालासोपारा - मुंबई) व प्रदीप रवळनाथ गुरव ( 27 वर्षे, चंदगड - कोल्हापूर) अशी आहेत. पोलिसांनी संशयितांकडून विविध कंपन्यांचे १६ कार स्टरिओ, रेडिमेड कपडे, एक कार तसेच मोबाईल्स जप्त केले आहेत.

या टोळीने एका रात्रीत पणजी, पर्वरी व म्हापसा येथील कारमधील स्टिरिओ चोरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. गोवा पोलिसांनी वेगवेगळ्या तुकड्या तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. यासंदर्भात मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे संशयित बेळगाव मार्गाने गेल्याची माहिती मिळाली. गोव्याचे पोलिस पथक बेळगावला पोहचले व त्यांना ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

Bicholim Online Fraud: 'इन्व्हेस्टमेंट'च्या नावाखाली फसवणूक! लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT