Representative image Unsplash
गोवा

Ganesh Festival in Goa: गणेश भक्तांची छोट्या मूर्तींना पसंती

गोव्यात गणेश भक्तांकडून गेल्या वर्षापासून छोट्या गणेशमूर्तींना (Ganesh Idols) पसंती दिली जात आहे.

दैनिक गोमन्तक

गणेश चतुर्थी (Ganesh Festival)अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. गणेश भक्तांकडून गेल्या वर्षापासून छोट्या गणेशमूर्तींना (Ganesh Idols) पसंती दिली जात आहे. त्यासाठी यंदा एक फुटाच्‍या सुमारे साठ गणेशमूर्ती बनविण्यात आल्याचे माशे येथील मूर्तिकार मनोज प्रभुगावकर यांनी सांगितले. एक फूट उंचीच्या गणेश मूर्तीची बिदागी आठशे रुपये आहे. त्याशिवाय तीन फूट उंचीच्या मूर्तीची बिदागी साडेतीन हजार रुपयांपर्यंत जाते, असेही त्‍यांनी सांगितले.

काणकोणात कदंब बसस्थानकासमोर असलेल्या शेतातून चिकणमाती उपलब्ध होत होती, मात्र रवींद्र भवनाच्‍या बांधणीला सुरुवात झाल्यापासून या शेतजमिनीतून चिकणमाती मिळणे कठीण बनले आहे. त्याचप्रमाणे माजाळी येथील तळ्यातून पूर्वी चिकणमाती काणकोणमधील मूर्तिकारांना उपलब्ध होत होती, तो स्रोतही आता बंद झाला आहे. त्यामुळे आता सावंतवाडीहून चिकणमाती आणावी लागत आहे. ही माती पावडर स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते. शंभर रुपये प्रति बॅग याप्रमाणे ती सावंतवाडीत उपलब्ध होते, मात्र ती आणण्यासाठी साडेसात हजार रुपये वाहन भाडे द्यावे लागते, अशी माहिती मूर्तिकारांनी दिली.

फोंड्यातील बाजारात गणेशमूर्ती दाखल

गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, फोंड्यात मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. यंदा कोरोनाचा जोर ओसरला असला तरी गणेशोत्‍सव साधेपणाने साजरा करण्‍यावरच भर दिला जाण्‍याची शक्‍यता आहे. छोट्या आकाराच्‍या गणेशमूर्ती विक्रीस उपलब्‍ध आहेत. मोठ्या आकाराची गणेशमूर्ती उपलब्ध नाही. गणेशमूर्तींचे दर ६०० रुपयांपासून २२०० रुपयांपर्यंत आहेत.

गणेश चित्रशाळा गजबजू लागल्‍या

गणेश चतुर्थी सण जसजसा जवळ येऊ लागला तसतसे फोंडा तालुक्यातील गणेश चित्रशाळा गजबजू लागल्या आहेत. फोंडा तालुक्यातील चित्रशाळेत गणेशमूर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यावर येऊ लागले आहे. मूर्डी-खांडेपार येथील प्रकाश च्यारी व त्यांच्‍या कुटुंबीयांनी मूर्तिकामाची परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे. प्रकाश च्यारी यांनी आतापर्यंत शंभर मूर्ती रंगविण्याचे काम पूर्ण केले असून, जन्माष्टमीपर्यंत रंगकाम पूर्ण होणार आहे. गणेशमूर्तींच्‍या नोंदणीत गेल्यावर्षीपेक्षा यंदा थोडी वाढ झाली आहे, असे च्‍यारी म्‍हणाले.

फ्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या मूर्तींवर बंदी घालावी

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची आयात व त्याची विक्री करणाऱ्यांविरुद्ध काणकोणमधील सुमारे १६ पारंपरिक गणेशमूर्ती कलाकारांनी राज्याचे मुख्य सचिव व राज्यपालांकडे तक्रार दाखल केली आहे. या मूर्ती पर्यावरणाला घातक आहेतच, त्याचबरोबर त्या पारंपरिक मूर्ती कलाकारांच्या व्यवसायाला बाधा पोचवत आहेत. त्यामुळे राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करावी. त्याचप्रमाणे उत्तर व दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना व पोलिसांना याबाबत लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारे निवेदन १७ ऑगस्टला काणकोणमधील मूर्तिकारांनी दिले आहे.

या निवेदनावर मनोहर राम पागी, रोहिदास च्यारी, संदीप च्यारी, निरज च्यारी, आनंद च्यारी, अंबर पागी, दत्तप्रसाद प्रभुगावकर, विलास नाईक, चंद्रकांत नाईक, रंगनाथ धुरी, अवधूत धुरी, प्रसाद बांदेकर, गुरूदास पागी व लखन पागी या मूर्तिकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT