गणेश चतुर्थी सणावर पावसाचे संकट कायम उत्साहावर विरजण, डिचोलीत बाजार थंडावला  Dainik Gomantak
गोवा

Ganesh Festival: मुसळधार पावसामुळे गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजण

बाजारपेठेवरही पावसाचा परिणाम झाला असून, बाजारपेठेतील व्यवसाय थंडावले आहेत.

दैनिक गोमन्तक

डिचोली: सर्वत्र चतुर्थीचा उत्साह संचारला असतानाच, कालपासून पुन्हा पावसाचा कहर सुरु झाला आहे. पावसाने पुन्हा जोर धरल्याने गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. बाजारपेठेवरही पावसाचा परिणाम झाला असून, बाजारपेठेतील व्यवसाय थंडावले आहेत. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार जोरदार पाऊस पडला, तर उद्या (मंगळवारी) पाच दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी गणेशभक्तांची मोठी पंचांईत होण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांतील पाण्याची पातळी वाढली आहे.

त्यामुळे गणेशभक्त चिंतेत अडकला आहे. उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास गणपती विसर्जनावेळी मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आठवड्यापूर्वी पावसाने डोके वर काढले आहे. मागील आठवड्यात ऐन चतुर्थीच्या बाजारावेळी पावसाने कहर केला होता. नंतर मात्र चतुर्थीच्या पूर्वदिनी आणि चतुर्थीच्या दिवशी पावसाने उघडीप केल्याने गणेशभक्त काहीसे सुखावले होते. मात्र चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून पावसाचा खेळ सुरु झाला आहे. काल रविवारपासून तर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. आज (सोमवारी) तर पावसाची संततधार चालू होती. सकाळपासून दुपारपर्यंत तर जोरदार पाऊस पडला.

बाजार थंडावला

आधीच 'कोविड' महामारीमुळे बाजारावर मर्यादा आल्या आहेत. त्यातच पावसाच्या संकटामुळे यंदा ऐन चतुर्थीत बाजारावर परिणाम झाला आहे. फटाके आदी साहित्यासह, कपडे आणि अन्य दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवरही परिणाम झाला आहे. पावसाची संततधार सुरु झाली, की बाजारातील विक्रेत्यांना आपला व्यवसाय बंद करून ठेवण्याची पाळी येत आहे. एकंदरीत यंदा चतुर्थीचा बाजार थंडवल्यातच जमा आहे. पावसाने यंदा आमच्या व्यवसायावर पाणी फेरले. अशी प्रतिक्रिया विक्रेते व्यक्त करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT