Ganesh Chaturthi 2023 Festival In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2023: पुण्यभूमी गोमंतकातील ‘चवथ’

गोव्यात चतुर्थी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो

संजय घुग्रेटकर

Ganesh Chaturthi 2023 Festival Is Celebrated In Goa: गोव्यात गणेशोत्सवाला "चवथ'' म्हणून संबोधले जाते. गोव्यात चतुर्थी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व कुटुंब एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. गरीब, श्रीमंत, उच्चवर्णीय, आस्तिक, नास्तिक सगळेच या सणाला एकत्र येतात. या काळात कोठेही जात नाहीत, सर्वच व्यवहार बंद असतात.

गोव्यातील चवथ भाद्रपद शुक्‍ल चतुर्थीला सुरू होते, पण तिची समाप्ती एकाच दिवशी होत नाही. चवथीचा उत्सव मखरात गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून सुरू होतो आणि गावातल्या नदीत, तळ्यात, विहिरीत किंवा ओढ्यात त्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर संपतो.

काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्‍ल पंचमीला श्रीगणरायाचे विसर्जन केले जाते. याला दीड दिवसांची "चवथ'' म्हणतात. तर ठिकाणी पाचव्या, सातव्या, नवव्या, दहाव्या किंवा अकराव्या दिवशी चवथीची समाप्ती होते.

क्वचित ठिकाणी एकवीस दिवसही गणेश पूजन केले जाते. तर काही समाजात वर्षभरही गणेशमूर्ती ठेवली जाते. गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर पूजा केली केली जाते. यावेळी आरती म्हटली जाते.

गोव्यात आरती हा प्रकारही वैशिष्ट्यपूर्ण आहे. झांज, घुमट वाजवून आरती म्हटली जाते. साग्रसंगीत आरतीसाठी समेळ, घुमट, कासाळे घेऊन किंवा पेटी, पखवाज, झांज घेऊन आरती म्हटली जाते.

ग्रामपातळीवर आरती म्हणणारा मोठा गट निर्माण होतो आणि अनेक आरत्या गणेश पूजेला म्हटल्या जातात. एकूणच गोमंतकीय "चवथ'''' आगळ्या वेगळ्या प्रकारे मनोभावे साजरी केली जाते.

चवथीचे "ओझे''''

देशातील इतर प्रांतात नवीनच लग्न झालेल्या मुलीला माहेरून काही वस्तू देण्याची पद्धत आहे. परंतु गोव्यात "ओझे'''' (वजे) पद्धत वेगळी आहे. अशा पद्धत देशावर दिसत नाही.

गोव्यात मुलाच्या घरून जावयाच्या घरी वजे पाठवण्याचा रिवाज आहे. या वझ्यात करंजा, लाडू व इतर फराळ, फळफळावळ इत्यादी सोबत माटोळीला लागणारे लाकडी सामानही पाठवले जाते.

माशेल-कुंभारजुवेचा सांगोड

माशेल-कुंभारजुवेतील नदीत सात दिवसीय सांगोडोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. माशेल येथील शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिरातील सात दिवशीय गणेशमूर्तीचे विसर्जन कुंभारजुवेतील मांडवी नदीच्या फाट्यात केले जाते.

त्यावेळी गावातील काही गणेशमूर्ती सांगोडावर ठेवल्या जातात. सांगोड सजविले जातात. दोन होड्यांना एकत्र बांधून सांगोड तयार केला जातो. या सांगोडावर देवदेवतांच्या मूर्ती ठेवून आकर्षक देखावे केले जातात.

अलीकडच्या काळात स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत पौराणिक, आधुनिक वेशभूषेत विविध देखावे सादर केले जातात. हा सोहळा प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच सांगोड म्हणजे काय ते समजते.

त्यामुळे दरवर्षी भाविकांबरोबरच पर्यटकही मोठ्या संख्येने हा सोहळा पाहण्यासाठी नदीच्या माशेल व कुंभारजुवेच्या दोन्ही तिरावर मोठी गर्दी करतात.

खास गोमंतकीय ‘माटोळी’

गणेशमूर्तीला मखरात बसविण्याआधी माटोळी बांधली जाते. "माटोळी''' हा प्रकार फक्त गोवा आणि तळकोकणात आढळतो. कोकणात त्याला माटवी असेही म्हणतात. ही माटोळी मखराच्या पुढे छताला टांगून बांधली जाते.

बांबूच्या काठ्यापासून सर्वसाधारणपणे चौकोनी आकाराचा सांगाडा आधी तयार केला जातो. तो छताला बांधला की या माटोळीला सर्वप्रथम मध्यभागी बांधली जाते, ती पाच, सात किंवा नऊ नारळांची पेंड. ती न मिळाल्यास मोठ्या आकाराचा न सोललेला नारळही बांधला जातो. त्यानंतर माटोळीच्या चारही कडांना आम्रपर्णांच्या डहाळ्या बांधल्या जातात.

जंगलात किंवा डोंगरावर सापडणारी कांगलां, कुंडळां, नागूूचे कुडे, घागऱ्या, पोफळीचा कातरा अशा अनेक वस्तू माटोळीला टांगल्या जातात. त्या बांधण्यासाठी दोरी किंवा सुंभ वापरला जात नाही. त्याऐवजी केवणीचे दोर वापरले जातात.

दुधी भोपळा, घोसाळी, तवशी, केळ्यांचा घड, मक्‍याचे कणीस, पेरू, सफरचंद, डाळिंब या सारखी निसर्गाची देणही माटोळीला बांधले जाते. आकर्षक माटोळी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार व स्थानिक संस्था, क्‍लबतर्फे स्पर्धाही घेतली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT