Vijai Sardesai: विजय सरदेसाईंच्या नावाने फेसबूकवर फेक अकाऊंट; सायबर पोलिसांत तक्रार

सर्वांनी याची तातडीने दखल घ्यावी असे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे
 Vijai Sardesai Fake Facebook Account
Vijai Sardesai Fake Facebook AccountDainik Gomantak
Published on
Updated on

Fatorda MLA And Goa Forward President Vijai Sardesai Fake Facebook Account: गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्या नावे अज्ञाताने खोटे फेसबूक अकांऊट काढल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबतची माहिती सरदेसाई यांनी सोशल मिडीयावरुन दिली.

याप्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच सर्वांनी याची तातडीने दखल घ्यावी असे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे.

 Vijai Sardesai Fake Facebook Account
Crime News: गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

काही दिवसांपूर्वी गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते. अज्ञाताने डिसोझा यांच्या अकाऊंटवरुन काही जणांकडे पैसे मागितले होते.

दरम्यान आता अज्ञाताने आमदार विजय सरदेसाई यांचे खोटे फेसबूक अकांऊट काढल्याचे प्रकरण समोर आल्याने हॅकर्सने गोव्यातील राजकीय नेत्यांकडे मोर्चा वळवल्याचे दिसत आहे.

सरदेसाई यांनी याबाबतची माहिती ट्विट करीत दिली. ते म्हणाले, "माझ्या नावाने एक खोटे फेसबुक अकाउंट बनवून अज्ञात विविध लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहे आणि पैशांची मागणी करत आहे."

"मी पोलिसात तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरु केली आहे. मी तुम्हा सर्वांनी याची तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती करतो. खोट्या अकाऊंटवरील कोणत्याही मागण्यांना प्रतिसाद देऊ नका असे सरदेसाई म्हणाले.

 Vijai Sardesai Fake Facebook Account
Eid Milad Un Nabi 2023: 'ईद मिलाद-उन-नबी' निमित्त विशेष सुट्टी; सरकारचे परिपत्रक जाहिर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com