Ganesh Chaturthi 2022 Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2022 : गोव्यात लगबग गणरायाच्या आगमनाची

गणेशमूर्तींचे काम अंतिम टप्प्यात : चित्रशाळेत आबालवृद्धांची गर्दी

दैनिक गोमन्तक

पणजी : बाप्पाच्या आगमनाला महिनाही उरलेला नाही. त्यामुळे गावागावातील चित्रशाळांमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवून तयार असून, आता केवळ रंगकाम बाकी राहिले आहे; तर काही मूर्ती हातावेगळ्या करून मूर्ती पाहण्यासाठी येणाऱ्यांसाठी तसेच बुकिंगसाठीही ठेवण्यात आल्या आहेत. गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र जसे उत्साहाचे वातावरण आहे त्याचप्रमाणेच मूर्तिकारांमध्ये मूर्तिकाम लवकरात लवकर संपवून गणेश चतुर्थीसाठी सज्ज होण्याची लगबग सुरू झाली आहे.

गणेश चतुर्थी म्हणजे गोमंतकीय जनतेचा सर्वात मोठा व प्रमुख सण. गणपती बाप्पाच्या आगमनाचे दिवस जसजसे जवळ येऊ लागतात तसतसे कुटुंबातील सर्व जण बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी करतात. कोणी पताका लावतो, कोणी घराला रंगकाम करतो.

फेट्याच्या गणपतीचा ट्रॅण्ड

दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतींचा ट्रॅण्ड असतो. कोणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातला गणपती हवा असतो, कोणाला खंडोबाच्या, कोणाला विठ्ठलाच्या तर कोणाला लालबागचा राजा. काहींना कमळात बसलेला, काहींना उंदरावर बसलेला गणपती हवा असतो. मात्र यंदा राज्यात कापडी फेटा व धोतर नेसवलेल्या गणपतींना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील प्रमुख शहरातील गणपतीच्या चित्रशाळांमध्ये फेट्या धोतरातील गणपतींची संख्या अधिक दिसू लागली आहे.

रेखीव डोळे, सोनेरी मुकुट

गणपतीची मूर्ती पसंत करताना त्याची नजर पाहिली जाते. नजर समोर असेल आणि डोळ्यांचे रंगकाम रेखीव केले असेल तर अशा गणपतीच्या मूर्तींना अधिक पसंती मिळते, त्याचसोबत गणपतीचे रंगकाम भडक तर केले नाही ना तसेच श्री गणेश मूर्तीच्या मुकुटाचे तसेच दागिन्याचे सोनेरी रंगकाम करताना हलगर्जीपणा केला नाही ना, याकडेही पाहिले जाते. त्याचसोबत आजकाल मखर तसेच यंदाच्या वर्षी कोणत्या स्वरूपाची सजावट करणार आहे त्या अनुषंगानेही मूर्ती बनवली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT