चतुर्थीसाठी नेवऱ्या करण्यासाठी मग्न असलेल्या महिला. Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2021: गोव्यातील महिलांची गणरायच्या आगमनाची जय्यत तयारी

सगळ्यांचा आवडता सण गणेश चतुर्थी अवघ्या दिवसावर असून त्यासाठी मखर सजावट, रोषणाई साहित्याची बाजारात रेलचेल सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) निमित्त सर्वत्र लगबग अंतिम टप्प्यात येऊन ठेपली असून युवा वर्गाचा सजावटीकडे कल तर महिलांवर्गांचा चवथीसाठी करंज्या, लाडू, चकली, व इतर फराळ करण्याकडे व्यस्त आहे. तयारी पूर्णत्वाकडे आली असून गणरायाच्या आगमनाची वाट पाहत असल्याचे काहींनी सांगितले.

चतुर्थीसाठी नेवऱ्या करण्यासाठी मग्न असलेल्या महिला

सगळ्यांचा आवडता सण गणेश चतुर्थी अवघ्या दिवसावर असून त्यासाठी मखर सजावट, रोषणाई साहित्याची बाजारात रेलचेल सुरु आहे. गणेश चतुर्थी निमित्त लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. झेंडूच्या फुलांची (100 ते 150 रुपये), प्लास्टिक फुलांचा हार ( 100 ते 500 रुपये), थर्माकोलची मखरे (500 ते 3000 रुपयांपर्यंत) विकले जात आहे. सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच दिवे, पणत्या, समया यासारख्या वस्तू त्याशिवाय पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यास लोक मग्न आहेत. याव्यतिरीक्त रांगोळी, पडदे, याव्यतिरिक्त सजावटीसाठी लागणारे अन्य साहित्य घेण्यासाठी बाजारात गर्दी वाढत आहे.

दरम्यान महिला मंडळाचा करंज्या, चकल्या, मोदक, लाडू, शेव, अन्य जिन्नस तयार करून ठेवण्यास मग्न आहेत. त्यामुळे चतुर्थीचा माहोल तयार झाला आहे. या व्यतिरिक्त मकर सजावट, पताका लावण्यासाठी युवकांची लगबग सुरू आहे. ती लक्षात घेऊन तयारीला जोर लावला असून तयारी पुर्णत्वास आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT