Ganesh Chaturthi 2021: माटोळीच्या वस्तूंचे दर वधारले

गोव्यामधल्या गणेशोत्सवात माटोळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. माटोळी (Matoli) ही निसर्गातील फळा-फुलांची केलेली आरस असते.
Ganesh Chaturthi 2021: माटोळीच्या वस्तूंचे दर वधारले
Ganesh Chaturthi 2021: माटोळीच्या वस्तूंचे दर वधारलेसंदीप देसाई

पणजी: चतुर्थी उत्सवात गणेशमूर्ती पूजन करण्यापूर्वी गणेशमूर्ती पूजनाच्या जागेवरील भागात माटोळी बांधण्याची राज्यात परंपरा आहे. जंगलात मिळणाऱ्या व बागायतीतील पारंपरिक वस्तू, फळेऔषधी वनस्पती या माटोळीला बांधल्या जातात. परंतु यंदा राज्यात माटोळीच्या वस्तूंचे दर दुप्पट झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

Matoili is widely used as decorative item in Goa during Ganesh Chaturthi
Matoili is widely used as decorative item in Goa during Ganesh ChaturthiDainik Gomantak

पणजीतील मार्केट परिसरात आजपासून माटोळीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्‍ध झाल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेने या सर्वच वस्तूचे दर दुप्पट झाले आहेत. सुपारीचा एक मोठा कातरो 1500 ते 2 हजार रुपयापर्यंत उपलब्ध आहे. तर गतवर्षी 50 रुपयांना मिळणाऱ्या जंगली वस्तूंचे गुच्छ यंदा 100 रुपये झाले आहेत. तोरिंगचा दर 200 रुपये तर नारळाची पेंड 50 रुपये प्रती नारळ या दराने विक्रीला उपलब्ध आहेत. वाढलेल्या दरामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असली तरी चतुर्थी धुमधडाक्यात साजरी करण्याच्या इराद्याने त्याचा विचार केला जात नाही

Ganesh Chaturthi 2021: माटोळीच्या वस्तूंचे दर वधारले
Ganesh Chaturthi 2021: गोव्यात पर्यावरणपूरक मखर

दरम्यान, राज्य सरकारचे कला व संस्कृती खाते दरवर्षी राज्यस्तरीय माटोळी स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धेत भाग घेणारे विशेषतः सत्तरी, सांगे, काणकोण फोंडा तालुक्यातील नागरिक आपल्या माटोळीला 1150 ते 200 प्रकारच्या बागायती वस्तू, फळे व जंगलातील वस्तू बांधतात. या स्पर्धेमुळे राज्यात माटोळी स्पर्धेचा प्रसार जास्त होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com