Honorable while releasing Ganesh Aarti collection.
Honorable while releasing Ganesh Aarti collection. Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi च्या निमित्ताने अनबिटेबल डान्स अकादमीतर्फे गणेश आरती संग्रह विमोचन केले

दैनिक गोमन्तक

दाबोळी : उद्या पासून सुरु होणाऱ्या सर्वांचे लाडके बाप्पाचे आगमन होत आहे. त्या गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi)निमित्ताने वास्कोच्या अनबिटेबल डान्स अकादमीतर्फे (Unbeatable Dance Academy)गणेश आरती संग्रहाचे विमोचन करण्यात आले. आरती संग्रह सोहळा हा हॉटेल सुप्रीम मध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी रवींद्र भवन वास्कोचे अध्यक्ष जयंत जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र भवन चे उपाध्यक्ष डॉ.धमेंद्र प्रभूदेसाय ,मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक सुदेश भोसले ,विनोद किनळेकर, अमय चोपडेकर, अनबिटेबल डान्स अकादमीचे संचालक तुषार वळवईकर, समाजसेवक रवी आमोणकर, उद्योजक देवेंद्र देव, सुनील शेट सर, सुप्रिम हॉटेलचे व्यवस्थापक समीर पाल्लेदार ,अनबिटेबल डान्स अकादमीच्या विश्वास रेखा वळवईकर, प्रवेश आमोणकर व इतर मान्यवर या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे जयंत जाधव यावेळी बोलताना म्हणाले, अनबिटेबल डान्स अकादमीचे संचालक (Director)तुषार वळवईकर यांची स्तुती करत ते एक उत्तम कलाकार असून त्यांनी आपल्या अकादमीच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत शेकडो युवक कलाकार घडवले आहेत. त्यांना उत्तम व्यासपीठ मिळवून दिल्याचे सांगितले. याप्रसंगी साधना मुकूदन, सुरेश भोसले ,विनोद केळकर ,देवेंद्र देव ,समीर पल्लेदार व सुनील शेट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी सूत्रसंचालन प्रवेश आंबेडकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

SCROLL FOR NEXT