G-20 summit - Appreciated during the visit to the health center Dainik Gomantak
गोवा

G-20 summit : ‘अनमोल’, ‘आरसीएच’ पोर्टल युनिसेफ प्रतिनिधींनाही भावले

इतर देशांसाठी उपयुक्त : नावेली आरोग्य केंद्राला भेटीप्रसंगी केले कौतुक

गोमन्तक डिजिटल टीम

Salcete : ‘जी-२०’ आरोग्य सेवा बैठकीसाठी आलेल्या ‘युनिसेफ’च्या प्रतिनिधींनी नावेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य विषयक सेवा सुविधांची पाहणी केली. ‘युनिसेफ’च्या न्युयॉर्कमधील डिजिटल प्रमुख कॅरीन कालंडेरच्या नेतृत्त्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाने केंद्र सरकारच्या बाल व महिला संबंधित सुरू केलेल्या ‘अनमोल’ व ‘आरसीएच’ पोर्टलची माहिती जाणून घेतली.

पोर्टलच्या पद्धती पाहून आपण प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील आरोग्य क्षेत्रात ही एका प्रकारची क्रांती असून अशा प्रकारचे पोर्टल अन्य देशांमध्येही असावे, असेही कालंडेर म्हणाल्या. दिल्ली येथील ‘युनिसेफ’चे प्रतिनिधी अजय त्राकाराव तसेच नावेलीच्या प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्त कामुलकर यांनी त्यांना पोर्टल बद्दलची तसेच केंद्रातील आरोग्य साधन सुविधांची माहिती दिली.

त्यांनी केंद्रातील फार्मसी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, प्रयोगशाळेला भेट देऊन पाहणी केली. शिवाय त्यांनी मलेरिया, डेंग्यू, मुलांना होणारा अतिसार वगैरेची येथील परिस्थितीचा आढावा घेतला. पण त्यांनी अनमोल व आरसीएच पोर्टलची पद्धती जाणून घेण्यावर जास्त भर दिला. ज्या गरोदर महिला तसेच बाल संरक्षण उपायांवर या पोर्टलवर डाटा कशा पद्धतीने पुरविला जातो, हे कालंडेर यांनी जाणून घेतले.

पोर्टलच्या त्रुटी दूर करण्यासाठी सूचना करू : कॅरिन कालंडेर

या पोर्टलमध्ये काही त्रुटी आहेत, असे सांगून कॅरीन कालंडेर म्हणाल्या की, सर्वसाधारणपणे हे दोन्ही पोर्टल सर्वोत्कृष्ट आहेत. केंद्र सरकार या पोर्टलमध्ये सुधारणा करून पहात आहे,तसेच त्यांचा दर्जा वाढविण्याच्या विचारात आहे. ‘युनिसेफ’तर्फे सरकारला निश्र्चितच सूचना केल्या जातील, असेही त्या म्हणाल्या. शिवाय सरकारने आरोग्य क्षेत्रातील अन्य आजारांसाठीही पोर्टल तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णाची सर्व माहिती एकत्रित राहील, असेही त्यांनी सूचित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT