Salcete: कोलमोरोड रस्त्याच्या जमीन संपादनाची सुनावणी 10 जानेवारीला

ही जागा नगरपालिका संपादन करणार नाही. केवळ या रस्त्याचे नगरपालिकेतर्फे डांबरीकरण केले जाईल.
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Salcete: उच्च न्यायालयात चालू असलेल्या कोलमोरोड येथील रस्त्यासाठीच्या जागा संपादन प्रकरणी काल बोलावण्यात आलेल्या बैठकीत कौन्सिलने पुढील प्रक्रियेसाठी तसेच लेखी ठराव व प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याचे अधिकार नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्याला दिले आहेत.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जानेवारी रोजी होणार असून त्यावेळी नगरपालिकेतर्फे वकील पराग राव सर्व लेखी कागदपत्रे सादर करतील, असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले.

कोलमोरोड येथे डांबरी रस्ता आहे. केवळ प्रश्र्न आहे तो 685 चौरस मीटर जागेचा. ही जागा नगरपालिका संपादन करणार नाही. केवळ या रस्त्याचे नगरपालिकेतर्फे डांबरीकरण केले जाईल. बैठकीत 3 जानेवारी रोजी जागा संपादन प्रसंगी झालेल्या सुनावणीची माहिती देण्यात आली.

न्यायालयात 2.73 कोटी रुपये भरणे आवश्यक होते. नगरपालिकेने ॲडव्होकेट जनरलांशी संपर्क साधला, पण सरकार या प्रकरणात सरकार पार्टी नसल्याने नंतर नगरपालिका प्रशासन संचालनालयाशी संपर्क साधण्यात आला.

संचालनालयाने नगरपालिकेच्या न वापरलेल्या 7.89 कोटी रुपयांतील सहायता अनुदानातून एवढी रक्कम नगरपालिकेला दिली, असे नगराध्यक्षांनी सांगितले.

Court
Goa: मोपा विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उड्डाण संचालनालयाचे थाटात उद्‌घाटन

पालिकेला रक्कम परत मिळणार

न्यायालयाने हे प्रकरण सहानुभूतिपूर्वक घेतले असून जागा संपादन करायची झालीच, तर सुधारीत रक्कमच देणे लागेल व बाकी रक्कम नगरपालिकेला परत केली जाईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Land Grab Scam
Bye-Election Legal Dispute India
Goa IIT
Goa High Court denies bail in land scam case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com