Aldona Dainik GomanTAK
गोवा

Aldona: 'फुटसाल मैदानाची जागा बदला'! हळदोणे ग्रामस्थांची मागणी; फेरेरांनी केले पर्यायी जागा सुचवण्याचे आवाहन

Aldona Ground: फुटसाल मैदानावरून हळदोणे पंचायतीने बोलावलेली विशेष ग्रामसभा गाजली. सभेला २६० ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. यावेळी सर्व पंचायत सदस्य उपस्थित होते.

Sameer Panditrao

बार्देश: फुटसाल मैदानावरून हळदोणे पंचायतीने बोलावलेली विशेष ग्रामसभा गाजली. सभेला २६० ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. यावेळी सर्व पंचायत सदस्य उपस्थित होते.

पंचायत क्षेत्रात फुटसाल मैदानाला विरोध नाही, मात्र त्याच्या सध्याच्या स्थानाला विरोध आहे, असे पंच विल्यम यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी दुसरे स्थान शोधावे अशी विनंती केली. यावेळी आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी ग्रामस्थांना दोन महिन्यांच्या आत पर्यायी जागा सूचवण्याचे आवाहन केले.

सरपंच आश्विन डिसोझा यांनी सांगितले की, फुटसाल मैदान हा प्रकल्प थेट क्रीडा प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. हळदोणे पंचायतीचा या प्रकल्पाशी काहीही संबंध नाही तसेच पंचायतीतर्फे या प्रकल्पावर कोणताही आर्थिक खर्च करण्यात येत नाही. ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केल्यामुळे आम्ही त्यांची मने दुखवू इच्छित नाही, म्हणूनच आम्ही ही बैठक बोलावली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार फेरेरा यांनी प्रकल्पाचा कायदेशीर पैलू आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार मैदानाच्या वापराबाबत ग्रामसभा सदस्यांना सविस्तर माहिती देताना सांगितले की, हे मैदान सर्वांचे आहे. काही लोकांमध्ये गैरसमज आहे की हे मैदान एका विशिष्ट शाळेसाठी केले गेले आहे, पण तसे अजिबात नाही.

हे मैदान सर्वांसाठी खुले आहे. जागेचा मोठा अभाव असल्यामुळे ग्रामस्थांच्या फायद्यासाठी सेंट थॉमस गर्लस हायस्कूलच्या मागे हा प्रकल्प सुचवण्यात आला आहे, असे ते म्हणाले. गाव आणि शाळा व्यवस्थापनाच्या भावना लक्षात घेता, आम्ही आराखड्यात बदल केले असून फुटसाल मैदान आता येथील मैदानाच्या दुसऱ्या बाजूला हलवले जाईल. ज्यामुळे शाळेचा वापर काहीही अडथळा न आणता सुरू राहील, असे आमदार फेरेरा यांनी सांगितले.

शाळेच्या वेळेत गोंधळ, उशिरा रात्री होणारे सामने आणि ध्वनिव्यवस्थेचा वापर याबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. यावेळी आमदार फेरेरा यांनी स्पष्ट केले की, हे मैदान सर्वांचे असून या मैदानावर शाळेच्या वेळेत कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. मैदान रात्री दहा वाजेपर्यंत खेळासाठी खुले राहील आणि ध्वनिक्षेपक व्यवस्था वापरण्यात येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT