Taligao Death News  Dainik Gomantak
गोवा

कुडासे बंधाऱ्यात बुडालेल्या तनिशावर अंत्यसंस्कार; नेत्यांनी केले सांत्वन

हरमल गावची तनिशा ठाकूर हिच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात काल सकाळी 10 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

कुडासे येथील बंधाऱ्यावर कुटुंबीयांसह आंघोळ करताना अचानक पाणी वाढल्यामुळे मामा आणि भाची दोघेही बुडाले. या दुर्घटनेत दुर्गावाडी-ताळगाव येथील प्रसिद्ध वकील विजय आनंद पाळयेकर आणि त्यांची भाची तनिशा ठाकूर या दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत बळी पडलेली हरमल गावची तनिशा ठाकूर हिच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात काल सकाळी 10 च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

काल सकाळी 9 च्या सुमारास तानिशाचा मृतदेह आणल्यानंतर वाड्यावरील लोकांनी व तिच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला तर उपस्थित ग्रामस्थांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.

तनिशा ही हुशार विद्यार्थिनी होती. शालेय स्तरांवर ती अभ्यासात हुशार होती व उत्कृष्टपैकी जलतरणपटू तसेच हुबेहूब चित्रे काढणे, हार्मोनियम, नृत्य वादनात हुशार होती. तिच्या पश्चात काका,काकी,चुलत बहिणी,भाऊ आहेत. तिचे वडील गोकुळदास हे वेर्णा खाजगी कंपनीत नोकरी करीत होते तर तिची आई महसूल खात्यात नोकरीस आहे.

यावेळी आमदार जित आरोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री रमाकांत खलप, सरपंच मनोहर केरकर आदींनी कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच बहुसंख्य लोकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

SCROLL FOR NEXT