गोव्याचे आर्चबिशप फा. फिलीप नेरी फेर्राव यांची कार्डिनलपदी नियुक्ती

हा गोवा चर्चसाठी मोठा बहुमान
Goa Church
Goa Church Dainik Gomantak

मडगाव : गोवा आणि दमणचे आर्चबिशप फा. फिलीप नेरी फेर्राव यांची कार्डिनलपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा पोप फ्रान्सिस यांनी केली असून गोवा चर्चसाठी हा मोठा बहुमान मानला जात आहे. गोवा चर्चमधून कार्डिनल हा बहुमान मिळवणारे ते पहिलेच गोमंतकीय आहेत. पोप फ्रान्सिस यांनी आज ही घोषणा केली. त्यांनी 21 नवे कार्डिनल नेमण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून त्यांना 27 ऑगस्ट रोजी पदभार देण्यात येणार आहे. या नव्या 21 कार्डिनल मध्ये हैद्राबादचे आर्चबिशप अँथनी पुला यांचाही समावेश आहे. (Appointment of Father Philip Neri Ferrau as Cardinal )

यापूर्वी मूळ गोमंतकीय असलेल्या आर्चबिशपना कार्डिनलपद मिळाले असले तरी ते दुसऱ्या डायॉसेजनशी संबंधित होते. फा. फेर्राव हे गोवा डायॉसेजन मधून झालेले पहिलेच कार्डिनल आहेत. फा. फेर्राव हे सध्या अखिल भारतीय आर्चबिशप संघटनेचे अध्यक्ष असून त्यांची कार्डिनलपदी झालेली नियुक्ती त्यांच्या शिरपेचात खोवलेला आणखी एक मानाचा तुरा समजला जात आहे.

Goa Church
नेपाळचे बेपत्ता तारा एअरचे विमान सापडले

कार्डिनल यांची नियुक्ती थेट पोप करत असतो आणि त्यांचा पोप कार्यालयाशी थेट संबंध असतो. नवीन पोपची नियुक्ती याच कार्डिनल मधून केली जाते. आणि त्या निवडीत हेच कार्डिनल मंडळ मतदान करत असते.

सध्या या कार्डिनल मंडळात 208 कार्डिनल असून त्यापैकी 117 जणांना मतदानाचा अधिकार आहे. आता या मंडळात आणखी 21 कार्डिनलांची भरती होणार असल्याने ही संख्या 229 वर पोहोचणार आहे. त्यातील 131 जणांना मतदानाचा अधिकार असेल. नवे जे 21 कार्डिनल नियुक्त केले जात आहेत त्यात युरोप खंडातील 8, आशिया खंडातील सहा, आफ्रिका खंडातील 2, उत्तर अमेरिका खंडातील 1 तर मध्य आणि लॅटिन अमेरिकेतील 4 आर्चबिशपांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com