Sanjeev Verekar Dainik Gomantak
गोवा

Sanjeev Verekar: संजीव वेरेकर यांच्‍या पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कार

मुलगी स्नेहा हिच्याद्वारे अंत्यविधी पार पडला.

गोमन्तक डिजिटल टीम

साहित्यिक, पत्रकार, कोकणी चळवळीतले कार्यकर्ते व साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी संजीव वेरेकर यांच्‍या पार्थिवावर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता शोकाकूल वातावरणात सावईवेरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्‍यात आले. त्यांची मोठी मुलगी स्नेहा हिच्याद्वारे अंत्यविधी पार पडला.

वेरेकर यांचे पार्थिव दुपारी अडीचच्‍या सुमारास मधलावाडा-सावईवेरे येथे त्यांच्या निवासस्थानी आणल्यावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्‍यात आले. यावेळी राजकीय, पत्रकारिता, साहित्य व विविध क्षेत्रांतील मान्‍यवर उपस्‍थित होते.

त्‍यात प्रामुख्‍याने राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी वीजमंत्री निर्मला सावंत, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर, गोमन्‍तकचे संपादक-संचालक राजू नायक, ज्‍येष्‍ठ पत्रकार सुरेश वाळवे, कोकणी साहित्यिक एन. शिवदास, दिलीप बोरकर, मुकेश थळी, उदय म्हांबरे, प्रकाश नायक, गोरख मांद्रेकर, सुभाष जाण, कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षा अन्वेशा सिंगबाळ, माजी अध्यक्ष चेतन आचार्य यांचा समावेश होता.

उपस्‍थित सर्वांनी संजीव वेरेकर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करून त्यांच्या कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arijit Singh Retirement: मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का, अरिजीत सिंगचा प्लेबॅक सिंगिंगला रामराम; पोस्ट करत म्हणाला, "मी आतापासून..."

Harry Brook: 11 चौकार, 9 षटकार... हॅरी ब्रुकनं 29 चेंडूत कुटल्या 90 धावा; श्रीलंकेच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Goa to Nepal on Electric Bike: गोव्याच्या पोरांची कमाल! 'इलेक्ट्रिक बाईक'वरून गाठलं थेट 'नेपाळ'; 3,300 किमीचा थरार

UGC New Rules: "जातीवरुन कोणाशीही भेदभाव होणार नाही!", युजीसीच्या नवीन 'समानता' नियमावलीवर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं VIDEO

KL Rahul Retirement: ''मनात संन्यास घेण्याचा विचार..." केएल राहुल क्रिकेटला ठोकणार 'रामराम'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

SCROLL FOR NEXT