Fuel Price Hike Dainik Gomantak
गोवा

Fuel Price Hike : इंधन दरवाढीचा फटका; विजेपाठोपाठ पेट्रोल १ रुपयाने, डिझेल ३६ पैशांनी महागले

Fuel Price Hike : गोव्‍यात पेट्रोलच्‍या दरामध्‍ये लिटरमागे एक रुपया, तर डिझेलच्‍या दरात ३५ पैसे वाढ केली आहे. यावर कामत म्हणाले की, गोव्‍यातील सरकार केवळ उधळपट्टी करते.

गोमन्तक डिजिटल टीम

Fuel Price Hike :

पणजी, संयुक्त वीज नियामक आयोगाकडे बोट दाखवून सरकारने केलेल्या तब्बल साडेतीन टक्के वीज दरवाढीच्या धक्क्यातून जनता सावरण्याच्या आतच आता इंधन दरवाढीची कात्री सरकारने जनतेच्या खिशाला लावली आहे.

विशेष म्‍हणजे, कॉंग्रेसशासित कर्नाटक राज्यात इंधन दरवाढ झाल्यानंतर समाज माध्यमांवर भरभरून व्यक्त होणाऱ्या सरकार समर्थकांची वाचा आज बसल्याचे दिसून आले.

राज्यातील भाजप-मगोप सरकारने पेट्रोलवरील व्हॅट २१.५ टक्के आणि डिझेलवरील १७.५ टक्क्यांपर्यंत वाढविल्यामुळे उद्यापासून (शनिवारपासून) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील. पेट्रोल १ रुपयांनी तर डिझेल ३६ पैशांनी महागणार आहे. पणजीत सध्या पेट्रोलचा दर ९५.२३ रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचा दर ८७.७९ रुपये प्रतिलिटर आहे. शनिवारपासून पेट्रोल ९६.२६ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ८८.१५ रुपये प्रतिलिटर महागणार आहे. सर्वांत स्वस्त पेट्रोल आणि डिझेल वास्कोत मिळते.

सरकारचे आर्थिक नियोजन ढिसाळ

गोव्‍यात पेट्रोलच्‍या दरामध्‍ये लिटरमागे एक रुपया, तर डिझेलच्‍या दरात ३५ पैसे वाढ केली आहे. यावर कामत म्हणाले की, गोव्‍यातील सरकार केवळ उधळपट्टी करते. इव्‍हेंटस्‌पायी कोट्यवधी रुपये खर्च करते. या सरकारला चांगल्‍याप्रक़ारे आर्थिक नियाेजन करून प्रशासन चालविणे जमत नाही. त्‍यामुळेच असे दर वाढवून सामान्‍य जनतेला वेठीला धरले जाते. या गोष्‍टीचा गोवा फॉरवर्ड पक्ष निषेध करतो, असे कामत यांनी म्‍हटले आहे.

दुर्गादास यांचे टीकास्त्र

भाजप प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी हल्‍लीच, वीज दरवाढ कमी करण्‍यासाठी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोलू, असे म्‍हटले होते. सदानंद तानावडे यांनी ही बाेलणी करण्‍याबरोबरच इंधन दरवाढही कमी करण्‍याची विनंती मुख्यमंत्र्यांना करावी, अशी उपरोधिक टीका दुर्गादास कामत यांनी केली आहे.

अन् भाजप प्रवक्त्यांची बोलतीच झाली बंद

वीज आणि पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निर्णयावरून सरकारची लोकप्रियता खालावत चालली असून सरकारकडून या निर्णयाचे कोणतेही समर्थन करण्यात आलेले नाही. भाजपच्या कोणत्याही प्रवक्त्यानेही याविषयी चकार शब्द उच्चारलेला नाही. मात्र, ही दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी केवळ राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडूनच नव्हे, तर सर्वसामान्याकडूनही केली जाऊ लागली आहे.

मतदारांवर सूड उगविण्‍यासाठीच दरवाढ : गोवा फॉरवर्डचा आरोप

मडगाव: दोन दिवसांपूर्वी गोव्‍यात वीज दरवाढ केली असतानाच आता पेट्रोल आणि डिझेलच्‍या दरांत वाढ करून सरकारने लोकांना आणखी एक झटका दिला आहे. दक्षिण गोव्‍यात भाजपच्‍या उमेदवाराचा पराभव झाला, यासाठी अशी दरवाढ करून सरकार मतदारांवर सूड तर उगवू पाहात नाही ना, असा प्रश्‍न गोवा फाॅरवर्ड पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

Pandharpur Wari: वारकऱ्यांना सरकारकडून 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत; प्लास्टिकमुक्त वारीला द्या प्राधान्य- मुख्यमंत्री डॉ. सावंत

SCROLL FOR NEXT