केपे: सावर्डे तीस्क येथील रस्त्याशेजारी बसणाऱ्या फळ व भाजी विक्रेत्यांचे गाळे आज सार्वजनिक बांधकाम खात्याने मोडून टाकले. त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या लोकांनी संबंधित खात्याने कोणतीही सूचना न देता कारवाई केल्याने सरकारविरोधी संताप व्यक्त केला आहे. (Fruit and vegetable vendors close their shops at Sanvordem Tisk )
सावर्डे तीस्क येथे जुवारी नदीच्या पुलाजवळ गेल्या तीन वर्ष्यापासून काही लोक मासळी,भाजी,व फळविक्री,लिंबू सोडा,रस ऑम्लेटचा व्यवसाय करीत असून यातील काहींनी पत्रे व प्लास्टिकची आच्छादने घालून शेड घालून व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती बऱ्याच वेळा या लोकांना सांगून सुद्धा शेड न काढल्याने आज ही कारवाई करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सांगण्यात आले.
याविषयी सावर्डे पंचायतीचे सरपंच संदीप पाऊसकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले पंचायतीकडे येथे व्यवसाय करणाऱ्या लोकांची नोंदणी आहे व त्यानुसार्या लोकांकडून सोपो गोळा केला जातो पण काही लोकांनी शेड उभारून व्यवसाय सुरू केल्याने आज ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले याविषयी आपण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांच्याकडे बोलणी करणार असल्याचे पाऊसकर यांनी सांगितले.
शेड न उभारता व्यवसाय करण्यास त्यांना मुभा असल्याचे त्यांनी सांगितले. सावर्डे पंचायत बाजार प्रकल्पासाठी जागेच्या शोधत असून जर चांगली जागा उपलब्ध झाल्यास पंचायत त्या ठिकाणी कायमस्वरूपी प्रकल्प उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.