Goa Vaccination Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आजपासून 15-18 वयोगटातील मुलांना मिळणार लसीचा दुसरा डोस

राज्यात 15 ते 18 वर्षे वयोगटातील सुमारे 72,000 मुले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात 15-18 वर्षे वयोगटातील सुमारे 6,000 मुले कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यास पात्र आहेत. आरोग्य सेवा संचालनालय (DHS) 31 जानेवारीपासून या मुलांसाठी लसीकरण मोहीम राबवणार आहे. (Goa Children Vaccination News Update)

कोरोना लसीचा पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेली मुलेच या दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत. गोवा (Goa) राज्य सरकारने 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली होती. राज्यात 15 ते 18 वर्षे वयोगटातील सुमारे 72,000 मुले आहेत.

लसीकरणाच्या (Vaccination) दुसऱ्या डोसबाबत बोलताना राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर म्हणाले की, 3 जानेवारीला लसीचा पहिला डोस घेतलेली सर्व मुले 31 जानेवारीला दुसऱ्या डोस घेण्यास पात्र आहेत. आतापर्यंत राज्यातील 80 टक्के मुलांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आतापर्यंत लसीचा पहिला डोस न घेतलेल्या मुलांच्या पालकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे बोरकर म्हणाले. लसीकरण मोहीम सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये (Schools) राबवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT