'काँग्रेस आणि गांधी परिवाराच्या योगदानाचा अमित शहांना विसर'

राजीव गांधींनी गोव्याला राज्याचा दर्जा दिला
Dinesh Gundu Rao on Amit Shah
Dinesh Gundu Rao on Amit ShahDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे आज रविवारी दाबोळी विमानतळावर दुपारी आगमन झाले. गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. फोंडा येथे झालेल्या प्रचारसभेत अमित शहा यांनी गोव्यातील कॉंग्रेस पक्षावर निशाना साधत जोरदार टीका केली.

दरम्यान, आता त्यांच्या टिकेला कॉंग्रेस नेते दिनेश गुंडू राव यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की गोव्यासाठी काँग्रेस आणि गांधी परिवाराचे योगदान अमित शहांना माहीत नाही. इंदिरा गांधींनीच ठरवले की गोव्याला सार्वमत हवे आहे, महाराष्ट्रासोबत राहायचे की नाही यावर जनमत चाचणी हवी आहे. आणि राजीव गांधींनी गोव्याला राज्याचा दर्जा दिला आहे. अस म्हणत अमित शहा यांच्या टिकेला सडेतोड उत्तर दिले. (Amit Shah in Goa)

Dinesh Gundu Rao on Amit Shah
अमित शहांची पत्रकारांसह भाजप कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक

दरम्यान, फोंडा येथे झालेल्या प्रचारसभेत अमित शहा यांनी गोव्यातील कॉंग्रेस पक्षावर निशाना साधत दिगंबर कामत म्हणजे अव्यवस्था, अस्थिरता आणि अराजकता असे म्हणत कॉंग्रेसला फटकारले. गोवा देशाच्या नकाशावर जरी लहान दिसत असला तरी गोवा (goa) राज्याचे खूप मोठे महत्व आहे. देशाच्या नकाशावर गोवा एका सुरेख बिंदीसारखा दिसायला हवा यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.

गोव्यातील कॉंग्रेस (Congress) नेते दिगंबर कामत यांनी काय केले याचा हिशोब जनतेला द्यावा. भाजपचे सरकार आल्यावर मागच्या (2021)अर्थसंकल्पात गोव्याच्या विकासासाठी 2,567 कोटी जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

umakant khot death case morjim
cm pramod sawant on goa fisheries
damu naik warns babu ajgaonkar
Goa Assembly Election 2027
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com