Ramesh Tawadkar
Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
गोवा

Ramesh Tawadkar: 29 वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन 13 पासून

दैनिक गोमन्तक

Ramesh Tawadkar: श्री बलराम शिक्षण संस्था काणकोण आणि राजभाषा संचलनालय पणजी गोवा यांच्या सौजन्याने गोमंत साहित्य सेवक मंडळ आयोजित 29 वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन प्रा.स.शं. देसाई साहित्यनगरी, आमोणे, काणकोण येथे दि. 13 व 14 रोजी होईल. यासंबंधीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष रमेश तवडकर यांनी दिली.

दि.१३ रोजी सकाळी ९ ते ९.३० आमोणे संस्कृती भवन ते साहित्यनगरी आमोणे संमेलन स्थळापर्यंत दिंडी, ९.३० वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते उद्‍घाटन होईल. यावेळी साहित्यिका सोनाली नवांगुळ प्रमुख पाहुण्या असतील. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष रमेश तवडकर, संमेलनाध्यक्ष डॉ. सोमनाथ कोमरपंत,

गो.सा.से.चे अध्यक्ष रमेश वंसकर, स्थानिक सरपंच सविता तवडकर, कार्याध्यक्ष सुनील पैंगीणकर, गो.सा.से.चे उपाध्यक्ष विठ्ठल गावस, कोषाध्यक्ष राजमोहन शेट्ये, कार्यवाह किसन फडते यांची उपस्थिती असेल.

गणेश बाक्रे यांच्या अध्यक्षतेखाली३.१५ ते ५ पर्यंत कविसंमेलन होईल. नूतन देव, गुलाब वेर्णेकर, विनोद नाईक, दुर्गाकुमार नावती, प्रकाश क्षीरसागर, कविता आमोणकर आदींसह इतर कवी भाग घेणार आहेत.

संध्याकाळी ५.१५ वा.कै.विष्णू वाघांच्या कवितांवर बाळकृष्ण मराठे यांचा कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी रविवारी राजू भिकारो नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ९.३० वा. ‘आज बाल वाड्मयाची उपेक्षा होत आहे का?’ हा परिसंवाद होईल. शीतल साळगावकर, रजनी रायकर, पुष्पा गायतोंडे, शर्मिला प्रभू भाग घेतील. सकाळी १०.४५ वा. सांस्कृतिक विचारवंत- गिरीश प्रभुणे यांची पत्रकार परेश प्रभू प्रकट मुलाखत घेतील.

‘आम्ही सावित्रीबाई -बहिणाबाईच्या लेकी’ वर १२.४५ वा. डॉ. अनिता तिळवे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. कवयित्री कविता बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली २.३० वा. कविसंमेलन होईल.

यात मीना समुद्र, गिरिजा मुरगोडी, उमेश शिरगुप्‍पे, संजय पाटील, बबिता गावस, मेघना कुरुंदवाडकर, प्रकाश तळवडेकर, लक्ष्मण पित्रे, य.बा. सुतार आदींसह अन्य कवी सहभागी होतील. संध्याकाळी ४.३० ते ५.३० पर्यंत खासदार सदानंद तानावडे यांच्या तसेच संमेलनाध्यक्षांच्या उपस्थितीत समारोप समारंभ होईल.

‘साहित्यात ग्रामीण चित्रण’वर परिसंवाद

‘गोमंतकीय कथांत मराठी साहित्यातील ग्रामीण चित्रण’ वर शनिवारी सकाळी ११.३० ते १२.४५ पर्यंत डॉ. प्रमदा देसाई यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद होईल. प्रा.विनय बापट, प्रा. सारिका अडविलकर, प्रा. शुभलक्ष्मी नाईक गावकर, प्रा. तृप्ती फळदेसाई भाग घेतील. दु.२ ते ३.१५ ‘इंग्रजी आक्रमणापुढे प्रादेशिक भाषांचे भविष्य’ वर स्नेहा म्हांबरे यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद होईल.त्यात डॉ. विनय मडगावकर, मिलिंद माटे, शांताजी नाईक गांवकर, मयुरेश वाटवे भाग घेतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT