Electricity Cut Dainik Gomantak
गोवा

राज्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले

ट्रान्सफॉर्मरचे नुतनिकरण होणे आवश्यक

दैनिक गोमन्तक

गोव्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित होणे, व्होल्टेज चढउतार यांसारख्या समस्या सुरु आहेत. कमी जोडण्या असताना वीज ट्रान्सफॉर्मरवर उभा केले गेले होते. मात्र वाढत्या विजेच्या मागणीमुळे नविन जोडण्या दिल्या जात आहेत. यामुळे कमी क्षमता असलेले वीज ट्रान्सफॉर्मर अखंडपणे कार्यान्वित न राहता विज पुरवठाबाबत खंडीत होण्यासारखे प्रकार वाढताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांना ही त्रास सहन करावा लागत आहे. (Frequent power outages have increased in the state )

ट्रान्सफॉर्मर (विद्यूत जनित्र ) वीजउपकरणे ही वारंवारता न बदलता एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये वीज प्रसारित करण्यासाठी वापरली जातात. प्रामुख्याने वीज स्त्रोत आणि प्राथमिक सर्किट्स दरम्यान शक्ती प्रसारित करण्यासाठी वापरले जातात. मात्र राज्यातील अनेक भागात लोकांना वीज खंडित होणे, व्होल्टेज चढउतार आणि वीज खंडित होण्याचा अनुभव वारंवार येतो आहे. तर पुन्हा एकदा या ट्रान्सफॉर्मरच्या कार्यक्षमता आणि सक्रियतेवर विचार करणे आवश्यक आहे.

कारण जुने पॉवर ट्रान्सफॉर्मर अजूनही वापरात आहेत. हे ट्रान्सफॉर्मर लोक कमी घरे असताना बसवण्यात आले असावेत. मात्र सद्याची व्यावसायिक आस्थापनांसह इमारती आणि गृहनिर्माण वसाहती आल्याने विजेची गरज वाढली आहे. त्यामुळे अशा परिसरातील ट्रान्सफॉर्मरचे अपग्रेडेशन होणे हे नागरिकांच्या वाढत्या समस्या पाहता अत्यावश्यक बनले आहे.

गोव्यात वीज समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु मात्र वेग वाढवणे आवश्यक

गेल्या काही महिन्यात पीर्ण,नानोडा पंचायतक्षेत्र परिसर 11 केव्ही कोलवाळे फिडरवर तातडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने पीर्णा येथील तनोडीवाडा, नाईकवाडा, थोरलीचनई, वडलीचनई, केळवाडा, उमलवाडा व त्याच्या सभोवतालच्या भागात, नानोडा पंचायतीतील गावात, मदंत, फडतीर, कार्क्याचो व्हाळ.

तसेच चाळीन, माझिलवाडा, वेताळ मंदिर, कॉर्पोरेशन बँक, सिमोल्डा, जुवें, तारीर, पीएचसी कोलवाळे, रामनगर, तारचेगालू, मुशीरवाडा, सेंट रॉकवाडा, सेंट फ्रान्सिसवाडा, कोनीवाडा, सहकार सोसायटी, व्हीपी कोलवळे येथील माडलो गॅरेज आणि सभोवतालच्या भागात वीज (Electricity) पुरवठा खंडीत केला होते. त्यामुळे गोव्यात वीज समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र या कामाचा वेग वाढवणे आवश्यक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT