Freestyle Fighting of Students in Panjim Dainik Gomantak
गोवा

पणजीत विद्यार्थ्यांमध्ये जुंपली फ्रीस्टाईल हाणामारी

पोलिस अनभिज्ञ : कुजिरातील मारहाण प्रकरणाचे व्हिडीओ व्हायरल

आदित्य जोशी

पणजी : विद्यामंदिर म्हणजे साक्षात देवी सरस्वतीचे स्थान. येथे विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येतात. अशा पवित्र ज्ञानमंदिर परिसराचा कुस्तीचा आखाडा झाला, तर त्याला काय म्हणावे. मात्र, असा फ्री स्टाईल हाणामारीचा हंगामा कुजिरातील महाविद्यालय परिसरात पाहायला मिळाला आणि लोकांनी याबद्दल तीव्र नापसंतीही व्यक्त केली.

या धुमश्‍चक्रीचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी आगशी पोलिसांशी संपर्क साधला असता, त्याबाबत तक्रार आली नसल्याचे सांगितले. महाविद्यालय व्यवस्थापनाने याची दखल घेतली आहे.

कॅन्टिनमधील वादाचे पर्यवसान

मंगळवारी संध्याकाळी या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कॅन्टिनमधील व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यामध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची होऊन हातघाई झाल्याचे दिसून येते. त्यांना त्यांचे मित्र सावरताना दिसतात. यावेळी कॅन्टिनमध्ये इतरही विद्यार्थी होते. कदाचित शालेय आवाराबाहेर हाणामारी होण्यापूर्वीचा हा व्हिडीओ असावा आणि येथूनच वादाला सुरुवात झाली असावी, असे दिसते.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गणवेश आणि साध्या पेहरावात असलेल्या मुलांमध्ये हातघाईचा प्रकार सुरू असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येते. एक मिनिट 9 सेकंदाचा हा व्हिडीओ असून, फिल्मी स्टाईलमध्ये ही हाणामारी सुरू असल्याचे दिसते. त्याचवेळी बाजूला छत्री घेऊन उभ्या असलेल्या मुलींपैकी एक मुलगी हा प्रकार मोबाईलवर चित्रित करताना दिसते. तर त्यांच्याविरुद्धची एक मुलगी एकाला चापट लावताना दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT