Free WiFi In Panjim Dainik Gomantak
गोवा

Free WiFi In Panjim: स्मार्ट सिटी पणजीसह पर्वरी, बांबोळी, ताळगामध्ये 'फ्री वाय-फाय' सुविधा; जाणून घ्या झोन

Free WiFi In Panjim: पणजीत सुमारे 40 ते 50 ठिकाणांवर मोफत वायफाय सुविधा देण्यात आलीय.

Pramod Yadav

Free WiFi In Panjim

पणजी स्मार्ट सिटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट सिटीचे 95 टक्के काम पूर्णत्वाकडे गेले असून. येत्या काही दिवसांत या कामांची पाहणी महापौर, संचालक आणि इतर अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाणार आहे.

पणजीत केवळ स्मार्ट रस्ते, ड्रेनेज आणि विद्युत रोषणाई नव्हे तर फ्री वायफाय सारखी सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी पणजीसह ताळगाळ, बांबोळी आणि पर्वरी भागात मोफत वायफाय सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पणजीत सुमारे 40 ते 50 ठिकाणांवर मोफत वायफाय सुविधा देण्यात आलीय.

नागरिकांना वायफाय वापरण्यासाठी मोबाईलद्वारे लॉगिन करुन वायफाय वापरता येईल. मोबाईल धारकांना मोबईल नंबर अथवा ई-मेलच्या मदतीने लॉगिन करता येईल.

वायफाय वापरताना काही समस्यांचा समाना देखील करावा लागत असल्याची तक्रार काही स्थानिकांनी केली. वायफाय लॉगिन केल्यानंतर वारंवार लॉग आऊट होणे, वायफायचे कमी स्पीड आणि कधी कधी कनेशक्शन होण्यात विलंब लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मात्र, अनेकांनी त्यांच्या परिसरात मोफत वायफाय सुविधा उपलब्ध असल्याचे देखील माहीत नाही, असेही अनेकांनी सांगितले.

कोणकोणत्या भागात मोफत वायफाय सुविधा? जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ संपूर्ण पाहा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT