Goa To Mahakumbh Railway Dainik Gomantakm
गोवा

Goa Prayagraj Train: रेल्वेने प्रयागराजला निघाले, रत्नागिरीत उतरून गोव्यात परतले! विनापासवाल्यांचा गोंधळ; 400 प्रवासी जादा

Goa To Prayagraj Railway: मडगावहून प्रयागराजकडे जाणाऱ्या मोफत रेल्वेत सरकारचा पास नसतानाही चढलेल्या अनेकांना रत्नागिरीत पायउतार व्हावे लागले.

Sameer Panditrao

पणजी: मडगावहून प्रयागराजकडे जाणाऱ्या मोफत रेल्वेत सरकारचा पास नसतानाही चढलेल्या अनेकांना रत्नागिरीत पायउतार व्हावे लागले. त्या रेल्वेत पाय ठेवण्यास जागाच नसल्याने त्यांना दुसऱ्या रेल्वेचे तिकीट काढून परतीचा मार्ग पत्करावा लागला.

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रेल्वेत मडगावमध्ये चढले होते. समाज कल्याण खात्याने यादी दिलेल्या सोळाशे प्रवाशांपेक्षा चारशे प्रवासी जादा होते. त्यांना या प्रवासादरम्यान रेल्वे खानपान सेवा पुरवू शकणार नाही, कारण जेवण व चहापान व्यवस्था ही पासधारक अकराशे प्रवाशांपुरतीच मर्यादित आहे, असे स्पष्ट करण्यात आले होते.

अनेकांनी आम्ही सहन करू, प्रयागराजला जाण्याची ही संधी सोडायची नाही, असे कोकण रेल्वेच्या मडगाव येथील अधिकाऱ्यांना सांगितले होते. ही गाडी पूर्णतः सरकारने आरक्षित केली असल्याने त्यातून कोण प्रवास करत आहे, हे पाहण्याची राज्य सरकारचीच जबाबदारी आहे, असे मानून या अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करण्याची संमती देण्यात आली होती.

रेल्वे खचाखच भरल्याने पाय ठेवण्यासही जागा नव्हती. पास असलेल्यांची चांगली सोय झाली. रात्रीच्या जेवणाची त्यांची सोय झाली. मात्र पास नसलेल्यांना हातपाय पसरू देण्यास इतर प्रवाशांनी नकार देणे सुरू केले. प्रवास हा ६-७ तासांचा नव्हे, तर तब्बल ३६ तासांचा असल्याने प्रत्येकाला व्यवस्थितपणे, सुखकर पद्धतीने प्रवास करायचा होता. त्यांना हे आगंतुक प्रवासी नकोसे झाले होते. त्यामुळे काहींचे खटके उडणे गोवा ते रत्नागिरी प्रवासादरम्यानच सुरू झाले. कंटाळून काही प्रवाशांनी रेल्वे पाण्यासाठी आणि चालक, कर्मचारी बदलासाठी रत्नागिरी येथे थांबवली गेली, तेव्हा तेथे शंभरेक जणांनी उतरून गोव्यात परतीचा मार्ग पत्करणे सोयीस्कर मानले, असे अनेकजण आज सकाळी प्रयागराजऐवजी ते घरी परतले.

एका व्यक्तीवर ३६०० रुपये जेवण व चहापानावर खर्च

एका डब्यात ८० जणांची क्षमता होते १३० जण

रेल्वेत सेवेसाठी समाजकल्याण खात्याचे १८ कर्मचारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT