Khandepar Accident Dainik Gomantak
गोवा

Khandepar Accident: खांडेपार जंक्शन येथे विचित्र अपघात; 3 दुचाकी, 2 ट्रक, 1 कारचे नुकसान

ओव्हरटेक करण्याच्या नादात मालवाहू ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक, नंतर कार तीन दुचाकींसह कारवर उलटला ट्रक

Akshay Nirmale

Khandepar Goa Accident: खांडेपार जंक्शन येथे विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात ३ दुचाकी, दोन ट्रक आणि एका कारचे नुकसान झाले आहे. एका मालवाहतूक ट्रकने समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या वाहनाचा धडक दिली. त्यातून हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

फोंड्याहून उसगाव मार्गे मोलेच्या दिशेने जाणारा ट्रक खांडेपार जंक्शन येथे आल्यावर समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून या मालवाहू ट्रकची धडक उसगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला बसली. तेव्हा हा ट्रक समोरून येणाऱ्या कारवर आदळला.

मात्र सुदैवाने कार चालक सुखरूप बचावला. ट्रकला धडक दिल्यानंतर मालवाहू ट्रक रस्त्यावर कोसळला. त्यावेळी रस्त्यावर ३ दुचाक्या पार्क करण्यात आल्या होत्या. अपघातात पार्क केलेल्या तिन्ही दुचाक्या मालवाहू ट्रक खाली चिरडल्याने दुचाकी मालकाचे मोठे नुकसान झाले.

अपघातात कुणीच जखमी झालेले नाही. दरम्यान, येथील अर्धवट पुलाचे काम पूर्ण करण्याची गरज व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून पोलिसांनी पंचनामा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT