Goa Cyber Fraud Case
Goa Cyber Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Fraud: पैसे उकळण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे फेक व्हॉट्सॲप खाते, गोव्यात 2 तक्रारी दाखल

Pramod Yadav

Goa Cyber Fraud Case

गोव्यातून एक फसवणुकीची घटना समोर आली असून, सायबर गुन्हेगारांनी दोन उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत त्यांची बनावट व्हॉट्सॲप खाती तयार केली. लोकांकडून पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी दोन स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) रमेश वर्मा आणि राज्य विधानमंडळ सचिव नम्रता उलमन यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या आहेत.

वर्मा यांनी मंगळवारी, तर उलमन यांनी रविवारी तक्रार दाखल केली. संशयितांनी वर्मा आणि उलमन यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप खाती तयार करुन विविध लोकांकडून पैशाची मागणी केली, असे दाखल तक्रारीत म्हटले आहे.

संशयिताने वर्मा यांचा फोटो वापरून लोकांना तो मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) असल्याचे सांगत त्यांची फसवणूक केली तसेच, त्यांच्याकडून पैशाची मागणी केली. हीच मोडस ऑपरेन्डी उलमन यांच्याबाबत देखील वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दोन अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadev Betting Scam: 100 कोटींहून अधिकचे व्यवहार, 30 लाख गोठवले, 25 लाख जप्त; गोव्यात सात बुकींना अटक

Banking Sector Net Profit: मोदी सरकारच्या 10 वर्षात बँकिंग क्षेत्रात अमूलाग्र बदल; पहिल्यांदाच नफा 3 लाख कोटींच्या पार!

Shiroda SSC Result 2024 : ‘ब्रह्मदुर्गा’ चा निकाल यंदाही १०० टक्के

Harmal Garbage : हरमल वेशीवर कचराच; विद्रूपीकरण थांबवा

Ponda News : फोंड्याच्या मताधिक्यावर भाजप नेत्यांचे लक्ष; विधानसभेसाठी अनेक दावेदार

SCROLL FOR NEXT