Goa Scam  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Fraud Case: ‘मास्टरमाईंड’ कॉन्स्टेबल अखेर पोलिसांच्या ताब्यात; ‘ती’ महिला मात्र अजून गायब

Bicholim Scam: संशयित महिलेने केवळ डिचोलीतच नव्हे, तर अन्य भागांसह शेजारील राज्यातही अनेकांना इंगा दाखवल्याचे बोलले जात आहे

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घातलेली ‘ती’ संशयित महिला अद्याप फरार असून, पोलिस तिचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे. या महिलेचा साथीदार आणि या कारनाम्यामागील ‘मास्टरमाईंड’ पोलिस कॉन्स्टेबल रोहन वेंझी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची जबानीही घेतल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, त्याने जबानीत नेमकी कोणती माहिती दिली, ते समजू शकले नाही.

‘प्रिया’नामक संशयित महिलेने केवळ डिचोलीतच नव्हे, तर अन्य भागांसह शेजारील राज्यातही अनेकांना इंगा दाखवल्याचे बोलले जात आहे. रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिने अनेकांना चुना लावल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसही त्यादृष्टीने तपास करीत आहेत. संशयित महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतरच या प्रकरणाचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे.

सभ्यपणाचा आव आणून गंडा

प्रिया सभ्यपणाचा आव आणत होती. समोरच्या व्यक्तीशी ती ज्या पद्धतीने सहज संवाद साधत असायची, त्यावरून संशयित महिलेबाबत कोणालाही किंचितही संशय येत नव्हता. या महिलेने अनेकांकडून व्याजाने पैसे घेऊन त्याची वेळेवर परतफेड केली होती. तिने तिच्या संपर्कातील महिला आणि अन्य लोकांचा विश्वास संपादन केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: चौथ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्मा रचणार इतिहास, कोहलीच्या 'विराट' विक्रमाची बरोबरी करणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Dark Fog In Goa: पहाट ओढून घेतेय दाट धुक्‍याची चादर, सूर्यही उगवतोय विलंबानेच; काजू, आंब्यांच्या झाडांचा मोहोर करपून जाण्याचा धोका

Konkani Drama Competition: साखळीत आजपासून 'कोकणी नाट्य' स्पर्धा, मुख्यमंत्र्यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन; सत्तरी, डिचोलीतील 18 मंडळांचा सहभाग

Camurlim Illegal Construction: 'ते' बांधकाम बेकायदाच! हायकोर्टाचे शिक्कामोर्तब; कामुर्लीतील बांधकाम पाडण्याचे आदेश

Goa Mining: आता डंप हाताळणी 'सावधानतेने'! डीपीआर आवश्यक; कोट्यवधींची बँक हमीही द्यावी लागणार

SCROLL FOR NEXT