Thivim Fraud Case Danik Gomantak
गोवा

Thivim Fraud Case: सरकारी नोकरी देण्याचे आमिष महिलेची फसवणूक; गुन्हा दाखल

वैद्यकीय चाचणीसाठी शुल्क म्हणून घेतले २० हजार रुपये

Kavya Powar

Thivim Fraud Case: सरकारी नोकरी देण्याचे भासवून तसेच वैद्यकीय चाचणीसाठी शुल्क म्हणून २० हजार रुपये घेत एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अमर मांद्रेकर ( पर्ये, सत्तरी) याच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला.

हा फसवणुकीचा प्रकार गेल्या दि. ९ नोव्हेंबर ते दि. ८ डिसेंबर या कालावधीत घडला. कान्सा, थिवी येथील फिर्यादी महिलेला संशयित आरोपीने आपण साखळी रवींद्र भवन येथे कामाला असल्याचे सांगितले.

त्यानंतर संशयिताने फिर्यादीला तिच्या भावाच्या मुलीला मासिक ३ लाखांची सरकारी नोकरी मिळवून देण्याची हमी दिली. नंतर संशयिताने फिर्यादीच्या भाचीची सरकारी नोकरीसाठी वैद्यकिय चाचणी करायचे आहे, यासाठी २० हजार रुपये रक्कम तिच्याकडून शुल्कपोठी घेतले. पण संशयिताने सरकारी नोकरी मिळवून दिली नाही किंवा घेतलेली रक्कम परत केली नाही.

आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादिंच्या लक्षात येताच तिने कोलवाळ पोलिसांत धाव घेत तक्रार गुदरली. त्यानुसार पोलिसांनी भा.दं.सं.च्या ४१९ व ४२० कलमाअंतर्गत संशयिता विरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत खरत हे करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

Valpoi News: पुलावरून घेतली उडी, स्थानिकांच्या धाडसामुळे वाचले प्राण; वाळपईत आत्महत्येचा प्रयत्न

Goa Assembly: 'भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका' आलेमाव आक्रमक; 'इतरांची उदाहरणं देऊ नका' मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Viral: देशाचं नाव खराब होतंय... विदेशी महिलेसोबत तरूणांकडून सेल्फीचा बहाणा, पुढे जे घडलं ते संतापजनक! पाहा VIDEO

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

SCROLL FOR NEXT