Onion Prices increases in Goa: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे महाराष्ट्रातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव जिल्हा नाशिक येथे शेतकऱ्यांनी गेली दोन दिवस तीव्र आंदोलन सुरू केले आणि कांदा सौदे बंद पडले.
थोड्याफार फरकाने या आंदोलनाचे पडसाद कांदा उत्पादन क्षेत्रात सर्वत्र उमटले. परिणामी गोव्यातील कांद्याच्या किमतीत वाढ कायम राहिली आहे.
गोव्यातील बाजारपेठेत बेळगाव आणि कोल्हापूरमधून आयात केला जातो. बहुतांशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकाच वेळी कांदा बाजारपेठेत आणल्यामुळे बाजारपेठेत मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध झाला व महाराष्ट्रातील बहुतांशी बाजारपेठेत कांद्याचे भाव हे पडले आहेत.
यातच कोल्हापूर बाजारपेठेत ही पाच ते सात रुपयांनी कांद्याचे भाव पडल्याने तेवढ्याच कमी किमतीत कांदा गोव्यामध्ये येणार आहे. परिणामी गोव्यातील किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे भाव पाच ते दहा रुपयांनी कमी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या राज्यातील खुल्या बाजारपेठेत कांदा 60 ते 70 रुपयांनी विक्रीसाठी असून फलोत्पादन दुकानांवर कांदा 54 रुपयांनी विकला जात आहे. बाजारपेठेपेक्षा फलोत्पादनचे दर जरी कमी असले तरी ते सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने निर्यात बंदी केली त्यानंतर कांद्याचे भाव पडले . महाराष्ट्रात सातारा ग्रामीण, पुणे ग्रामीण, अहमदनगर ग्रामीण, सोलापूर ग्रामीण व नाशिक जिल्हा या भागात सर्वाधिक कांदा उत्पादन होते.
याच ग्रामीण भागात उत्पादित झालेला कांदा हा नाशिक लासलगाव, पुणे, सोलापूर व कोल्हापूर येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक कांदा बटाटा बाजारपेठेत येतो. येथे सौदे झाल्यानंतर कांदा दक्षिण भारतात तसेच कोकण, गोव्याकडे पाठवला जातो. यात कोल्हापूरात सौदे झालेला कांदा हा बहुतांशी प्रमाणात गोव्यामध्ये येतो.
निर्यात बंदीच्या आदेशानंतर बहुतांशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भाव पडतील याचा अंदाज घेऊन तातडीने कांदा कोल्हापूरच्या बाजारपेठेत आणला. दररोज सरासरी 50 गाड्यां कांद्याचे आवक होती त्याऐवजी शनिवारी एका दिवसात 70 गाड्यांची आवक झाली शिल्लक कांदा व नव्याने आलेला कांदा अशी एकूण आवक वाढल्याने जवळपास 5000 होती एका दिवसात सौद्यात आली.
कोल्हापूरच्या कांदा व्यापाऱ्यांनी जो कांदा शेतकऱ्यांच्याकडून खरेदी केला तोच कांदा आता ते गोव्याकडे पाठवतील. त्यामुळे गोवा बाजारपेठेतील सुद्धा सरासरी पाच ते सात रुपये प्रति किलो कांदा स्वस्त होण्याची शक्यता आहे.
डिसेंबर महिन्यात गोव्यात पर्यटकांची रेलचेल वाढते. या महिन्यात राज्यात अनेक म्युझिक इव्हेंट्स, सनबर्न, ख्रिसमससाठी देशविदेशातील पर्यटक मोठ्या मुक्कामासाठी गोव्यात दाखल होत असतात. त्यामुळे विशेषता हॉटेलिंग क्षेत्रातून कांद्याला मोठी मागणी असते.
कांदा स्वस्त झालेल्या काळातच गोव्यातील कांदा खरेदीदारांनी मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केल्यास हाच कांदा गोवा बाजारपेठे पाच ते सात रुपयांनी कमी दरात विकता येणार आहे. त्याचा लाभ सामान्य ग्राहकाला होणार आहे.
गोव्यातील ज्या विक्रेत्यांनी मागील आठवड्यामध्ये कांदा खरेदी करून ठेवला आहे त्या कांद्याचे भाव कमी होणे कठीण असल्याचे दिसते.
शनिवारपासून पुढे आठवडाभरात जे कांदा विक्रेते कांदा खरेदी करतील त्याचे भाव पाच ते दहा रुपयांनी भाव उतरलेले असतील. बहुतांशी ठिकाणी भाव नियंत्रण समितीचे नियंत्रणच किरकोळ विक्रेत्यांवर नसल्याने अनेक जण स्वस्तातील कांदा दहा ते पंधरा रुपये जास्त दर लावून विकत असून यातून ग्राहकांची लूट सुद्धा होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.