Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: 55 लाखांची अफरातफर; वास्को पोलिसांत तक्रार

Goa Fraud Case: एका गोल्ड लोन कंपनीच्या वास्कोतील शाखेत 55 लाख 77 हजार रुपयांच्या सुवर्णालंकारांची अफरातफर केल्याची तक्रार कर्जदारांनी वास्को पोलिस स्थानकात नोंदवली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Fraud Case: एका गोल्ड लोन कंपनीच्या वास्कोतील शाखेत 55 लाख 77 हजार रुपयांच्या सुवर्णालंकारांची अफरातफर केल्याची तक्रार कर्जदारांनी वास्को पोलिस स्थानकात नोंदवली आहे. चार वर्षांपूर्वी काहीजणांनी या कंपनीच्या वास्को शाखेतून सुवर्णालंकार गहाण ठेवून कर्ज काढले होते.

कर्जदारांनी कर्जाची रक्कम वेळेत परत करून आपले सोने परत मागितले असता, त्यांना वर्षभर या शाखेने सोने देण्यास टाळाटाळ केली, असे गुरुदास नाईक, नीलिमा देसाई यांनी सांगितले. त्यामुळे कर्जदारांनी वकिलामार्फत वास्को पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. तरीही त्यांच्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे नीलिमा नाईक यांनी सांगितले. सध्या शाखा व्यवस्थापक फरार आहे.

55 लाखांचे अमलीपदार्थ जप्त

पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने 55 लाख रुपये किमतीचे अमलीपदार्थ म्हापसा - पर्वरी हमरस्त्यावर पकडले आहे. याप्रकरणी म्हापसा येथील मनीष म्हाडेश्वर यांना ताब्यात घेतले आहे. या पथकाला अमलीपदार्थांची वाहतूक केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. तो चालवत असलेल्या कारची तपासणी केली असता त्यात त्यांना 30 किलो गांजा, 5 किलो चरस आणि 50 हजार रुपये आढळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Eco Sensitive Zone: गावे वगळण्‍यासाठी मुख्‍यमंत्र्यांची धडपड! केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची घेतली भेट; पाहणी दौऱ्यासाठी पथक दाखल

Goa Politics: मुख्यमंत्री, तानावडे व सभापती दिल्लीत, चर्चांना उधाण; मंत्रिमंडळ फेरबदलाचा मात्र इन्कार

IPL Auction 2025: मास्टर ब्लास्टरच्या लेकाला मिळाला खरेदीदार! शेवटच्या क्षणी MI ने खेळला मोठा डाव

Rashi Bhavishya 26 November 2024: कुंटुबात आनंदाचे वातावरण राहील, पण बोलण्यावर ताबा ठेवा... काय सांगयतं 'या' राशीचं भविष्य?

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

SCROLL FOR NEXT