Fraud in Muthoot Finance
Fraud in Muthoot Finance Dainik Gomantak
गोवा

Fraud in Muthoot Finance: ‘मुथूट’च्या पर्वरी शाखेला 20.85 लाखांचा गंडा!

गोमन्तक डिजिटल टीम

Fraud in Muthoot Finance पर्वरी येथील मुथूट फिनकॉर्प लिमिटेड या फायनान्समध्ये खोटे सोने तारण ठेवून त्या कंपनीची 20.85 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध पर्वरी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.

याप्रकरणी मुथूट फिनकॉर्पच्या पर्वरी शाखा व्यवस्थापक प्रणिता पिळर्णकर या तक्रारदार आहेत.

या फसवणूकप्रकरणी, पर्वरी पोलिसांनी संशयित अक्षय पवार (24, कांदोळी), गौतमी पार्सेकर (29, कांदोळी), मलिकसाब नदाफ (24, कांदोळी), विश्रांती नानोडकर (53, कांदोळी), मंजुनाथ नाईक (24, नेरुल), गीता कुंडईकर (36, कळंगुट), प्रकाश दोड्डामणी (25, कांदोळी), जफर बेपारी (हळदोणा), किशोर चव्हाण (23, कांदोळी) या नऊ संशयितांविरुद्ध भादसंच्या 420 व 34 कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे.

या संशयितांनी २३ जून २०२२ ते ६ जुलै २०२२ दरम्यान, पर्वरी येथील मुथूट फायनान्समध्ये सामान्य हेतूने वेगवेगळ्या तारखांना संपर्क साधला आणि बनावट दागिने गहाण ठेवून विविध रकमेचे कर्ज घेतले.

अशाप्रकारे संशयितांनी फायनान्स कंपनीला एकूण २० लाख ८४ हजार ९९९ रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी फायनान्स कंपनीचा हलगर्जीपणाच त्यांना नडला आहे. पर्वरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रतीक भट प्रभू हे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

मिळून रचलेले कारस्थान

सूत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व संशयित एकमेकांच्या परिचयातील असून मिळून रचलेले हे एक कारस्थान असल्याचे प्राथमिक चौकशीत पोलिसांना आढळले आहे. संशयितांनी बँकेत खोटे सोने तारण ठेवून कर्ज घेतले.

मात्र, बरेच दिवस संबंधितांकडून कर्जाचे पैसे भरले न जात असल्याने फायनान्स कंपनीने कंपनीमधील तारण ठेवलेल्या सोन्याची पडताळणी केली असता फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला.

सोन्याची शहानिशा होत नाही

अलीकडे अनेक फायनान्स कंपनीवाले सोने तारण ठेवून कर्ज देतात. यावेळी कंपनीमधील कर्मचाऱ्यांनाच प्राथमिक सोने पडताळणीचे प्रशिक्षण दिले जाते.

मुळात कुणीच संबंधित प्रमाणित सोनाराकडून या सोन्याची शहानिशा करीत नसतो. त्यामुळे असे फसवणुकीचे प्रकार घडतात, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Lok Sabha Election 2024: ‘’शहजाद्याला PM बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा’’; व्होट जिहादवरुन मोदींनी काँग्रेसला पकडलं कोंडीत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

SCROLL FOR NEXT