Churchill Alemao Dainik Gomantak
गोवा

Churchill Alemao: सार्दिन हे एक नंबरचे खोटारडे; मी प्रामाणिक राजकारणी, शंका असेल तर बँक बॅलन्स तपासा...

चर्चिल आलेमाव यांचा पलटवार; सरदेसाई, रेजिनाल्ड यांना मी राजकारणात आणले

Akshay Nirmale

Churchill Alemao: दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन हे एक नंबरचे खोटारडे आहेत, मी प्रामाणिक राजकारणी आहे. जर कुणाला शंका असेल तर माझा बँक बॅलन्स तपासा, असा पलटवार चर्चिल आलेमाव यांनी केला आहे. तसेच विजय सरदेसाई आणि आलेक्स रेजिनाल्ड यांना मीच राजकारणात आणले, असेही ते म्हणाले.

चर्चिल आलेमाव यांनी दोन दिवसांपुर्वीच, भाजपची स्तुती केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत मी दक्षिण गोव्यात भाजप उमेदवारालाच पाठिंबा देणार, असल्याचे ते म्हणाले होते.

त्यावर दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार विजय सरदेसाई, आलेक्स रेजिनाल्ड यांनी आलेमाव यांच्यावर टीका केली होती. त्यावर चर्चिल यांनी पुन्हा पलटवार केला आहे.

चर्चिल आलेमाव म्हणाले की, सार्दिन हे एक नंबरचे खोटारडे आहेत. गोव्यात भाजप सरकार स्थापन होण्यास सार्दिनच कारणीभूत आहेत. 1999 मध्ये सार्दिन यांच्या पाठिंब्यामुळेच भाजप सत्तेत आला होता. तर विजय सरदेसाई यांनी 2017 मध्ये मनोहर पर्रीकर यांना मिठी मारली आणि भाजप सरकार सत्तेत आले.

मी आत्तापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. भविष्यात काय करेन ते आत्ताच सांगू शकत नाही. पण जेव्हा अल्पसंख्य समुदायातून येत असल्याने डॉ. प्रमोद सावंत यांना विरोध होत होता तेव्हा मी त्यांना पाठिंबा दिला होता. राजकारणात कुणीच मित्र किंवा शत्रु नसतो.

विजय सरदेसाई, आलेक्स रेजिनाल्ड यांना मी राजकारणात आणले. मी वेगवेगळ्या मतदारसंघातून 14 आमदार निवडून आणले. मी प्रामाणिक राजकारणी आहे. जर कुणाला शंका असेल तर माझा बँक बॅलन्स पाहा.

सार्दिन यांनी मार्कलिस्ट घोटाळ्यावर स्पष्टीकरण द्यावे. माझ्यावरील केसेस राजकीय सूडबुद्धीतून केल्या आहेत. मीच उद्घाटन केलेल्या जेलमध्ये मला जावे लागले होते. पण कोर्टाने माझी सुटका केली.

माझा मुलगा सॅव्हिओ आलेमाव बाणावलीतून निवडणूक लढवणार आहे तर मुलगी वालांका आलेमाव ही नावेली मतदारसंघातून निवडणूक लढवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT