Goa Elections 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Elections 2022: फ्रान्सिस्को सिल्वेरा मतदारांना धमकावत आहेत: रामराव वाघ

भाजपचे उमेदवार आणि स्थानिक आमदार फ्रान्सिस्को सिल्वेरा (Francisco Silveira) मतदारांना धमकावत असल्याचा आरोप आप च उमेदवार रामराव वाघ यांनी केला.

दैनिक गोमन्तक

Goa Elections 2022: विधानसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर आहेत. यामुळे गोव्यातील सर्वच पक्षांतर्फे घरोघरी प्रचाराला सुरुवात झाली आहे. निवडणुकीचे उमेदवार नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. आम आदमी पार्टीचे सांत आंद्रेचे उमेदवार रामराव वाघ (Ramrao Wagh) यांनी भाजपचे उमेदवार आणि स्थानिक आमदार फ्रान्सिस्को सिल्वेरा (Francisco Silveira) यांच्यावर आरोप केला आहे. ते त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्याकडे आलेल्या मतदारांना धमकावत आहेत. याप्रकरणी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने (Election Commission) लक्ष घालण्याची मागणी वाघ यांनी केली आहे.

ते म्हणाले की, 'मी कोणत्याही मतदाराच्या घरी गेलो, तर आमदार मतदारांना प्रश्न करतात की तुम्ही त्याला का भेटता, तो तुमच्या घरी काय करत होता, हे तुम्ही त्याचे का मनोरंजन करत आहात.?' मी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला याकडे लक्ष देण्याची विनंती करतो, असे वाघ म्हणाले.

सिल्वेरा यांनी 2017 ची निवडणूक विकासाच्या मुहूर्तावर लढवली असताना, आमदार म्हणून त्यांच्या कार्यकाळात कोणतेही मोठे विकास प्रकल्प राबवण्यात त्यांना अपयश आले आहे, असे वाघ म्हणाले. सिल्वेरा यांनी 10-15 वर्षांपूर्वी सुरू केलेला जुना डोंगरी पूल प्रकल्पाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. 20 कोटींच्या या प्रकल्पाचा स्थानिकांना कसा फायदा होईल हे सांगण्याची जबाबदारी सिल्व्हेरांची आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांची शेतजमीन गेली आहे, ज्याची भरपाई अद्याप देण्यात आलेली नाही. अगदी अखंडित वीज आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा तसेच सांत आंद्रेमध्ये (St. Andre Constituency) चांगल्या रस्त्यांची कमतरता आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

SCROLL FOR NEXT