Francisco Sardinha Dainik Gomantak
गोवा

सरकारला शाळा सुरु करण्याची घाई का? सार्दिन यांचा सवाल

भाजप सरकार अल्पसंख्यांकाच्या विरोधात असल्याचाही निशाणा

दैनिक गोमन्तक

सासष्टी : शाळा सुरु केल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत दक्षिण गोव्याचे कॉंग्रेस खासदार फ्रांसीस सार्दीन सरकारला प्रश्न विचारतात की सरकारला शाळा सुरु करण्याची घाई कशाला? मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. (Francisco Sardinha News Updates)

यंदाचे शैक्षणिक वर्ष संपायला केवळ दीड ते दोन महिने बाकी असताना सरकारने शाळा (School) सुरु करण्याची घाई केली नसती तर चांगले झाले असते. कोविडची परिस्थिती जरी सुधारत असली, तरी परिस्थिती अजून 100 टक्के निवळलेली नाही. त्यामुळे आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे धाडस पालकांना होत नाही, असे सार्दिन यांनी सांगितले. जरी शाळा सुरु केल्या असल्या तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची उपस्थिती अगदी नगण्य असेल असे भाकीतही सार्दिन यांनी केले. परिस्थिती 100 टक्के निवळल्यानंतर शाळांना सर्व तयारी करण्यास पुरेसा वेळ देऊन जूनमध्ये शाळा सुरु केल्या असत्या तर चांगले झाले असते, असेही सार्दिन म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचे सरकार अल्पसंख्यांकांच्या विरोधी असुन सरकारने त्यांच्या भावनेविरोधात निर्णय त्यांच्यावर लादू नये असा इशारा सार्दिन यांनी सरकारला दिला आहे. ओल्ड गोवा (Old Goa) येथील वारसा जागेवर बेकायदेशीर घर बांधले आहे ते पाडण्याचे काम सरकारने सुरु केले नाही. त्याच्या विरोधात अजुनही तिथे काही नागरीक निषेधार्थ बसले आहे. मात्र सरकारला त्याची कदर नाही असेही खासदार सार्दिन यानी सांगितले.

सध्या गोव्यात कार्निव्हलचा (Carnival) माहोल सुरु झाला आहे. पर्यटक गोव्यात यायला सुरवात झाली आहे. त्यामुळे काही मोक्याच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. पोलिसांनी वाहतुक सुरळीत करण्यासाठी कुठ्ठाळी, आगशी या ठिकाणी व्यवस्था करावी अशी सुचना खासदार सार्दिन यांनी केली आहे. कर्नाटक मधील कोलर जिल्ह्यामध्ये येशूचा पुतळा मोडल्यामुळे सार्दिन भलतेच संतापले आहेत. आपण कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना यासंबंधी पत्र लिहिणार नाही तर लोकसभेत शुन्य काळात हा प्रश्न उपस्थित करणार आहे, असे सार्दिन यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT