FRANCIS SARDINHA Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : पक्षश्रेष्ठी ठरवतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार: फ्रान्‍सिस सार्दिन

Goa Congress : पक्षात प्रवेश केलेल्या नवोदितांनी धीर धरावा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : सासष्टी, जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत चालली आहे, तसतसे आपणच उमेदवार असे सांगणारे कित्येकजण आळंब्याप्रमाणे वर येऊ लागले आहेत. काही नवागत तर स्‍वत:ची कुवत न पाहताच बाशिंग बांधून तयार आहेत.

या निवडणुकीतील उमेदवार काँग्रेस पक्षश्रेष्ठी ठरवील. त्‍यामुळे या नवोदित काँग्रेसवाल्यांनी शांत बसावे, थोडा धीर धरावा, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

उमेदवारीसाठी इच्‍छुक असलेले कित्‍येक‍ काँग्रेसवाले भाजपच्‍या पे-रोलवर आहेत. ते व्हॉट्स-ॲप ग्रुप करतात व त्यावरून काही ना काही सूत्रे सोडतच असतात, असे सार्दिन म्‍हणाले. आयोध्येतील श्रीराम मंदिराबाबत बोलताना ते म्‍हणाले की, प्रत्येकाने आपल्या धर्माप्रती आदर, प्रेम बाळगून चांगले आचरण करावे.

मात्र समाजामध्ये दुजाभाव करण्याचा प्रयत्न करू नये. त्यादिवशी दिवाळीसारखा सण साजरा करावा की नाही हा प्रत्येकाचा निर्णय असला तरी त्यापेक्षा एकमेकांमध्ये प्रेम निर्माण करा, महागाई खाली आणण्यासाठी उपाययोजना करा, देशाची आर्थिक स्‍थिती बळकट करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला दिला.

रस्‍त्‍यांची तातडीने दुरुस्‍ती करा

राज्‍यात दिवसेंदिवस रस्‍तेअपघात वाढत चालले असून, निष्‍पाप लोकांचे बळी जात आहेत. त्‍यामुळे सरकारने रस्‍त्‍यांची तातडीने दुरुस्ती करण्‍यासाठी पावले उचलावीत.

संजीवनी साखर कारखाना लवकरात लवकर सुरू करून ऊसउत्‍पादकांना दिलासा द्यावा. गवळी, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा, अशी मागणी सार्दिन यांनी यावेळी केली.

दुहेरी नागरिकता प्रश्र्नावरुन लोकांमध्ये जो गोंधळ निर्माण झाला आहे, तो केंद्र व राज्‍य सरकाने दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. मी याबाबत संसदेत आवाज उठविला आहे. शिवाय केंद्रीय गृहमंत्री व परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून हा प्रश्र्न लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली आहे.

फ्रान्‍सिस सार्दिन, खासदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT