fourth wave of corona in Goa in mid in June-July
fourth wave of corona in Goa in mid in June-July Dainik Gomantak
गोवा

गोव्यात जून-जुलैच्या मध्यावर कोरोनाची चौथी लाट?

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोनाचा पूर्वानुभव पाहता राज्यात जून-जुलैच्या मध्यावर कोरोनाची चौथी लाट येऊ शकते. मात्र, ती फार प्रभावशाली असणार नाही. पण नागरिकांनी काळजी घ्यावी, असे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचे मत आहे.

कोरोनाच्या संदर्भातील देशभरातल्या यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता तीन-साडेतीन महिन्यानंतर कोरोनाचा नवा म्युटेशन येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून राज्यात जून आणि जुलै च्या मध्यावर कोरोनाची चौथी लाट येऊ शकते. मात्र, राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होणार नाही. खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करावे, बूस्टर डोस घ्यावा. राज्यात सध्या लईराई देवीचा जत्रोत्सव सुरू आहे. याचा परिणाम येत्या आठवड्यात कळेल, असे मत कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केले आहे.

11 नवे बाधित 14 बरे

आज कोरोनाचे 11 रुग्ण सापडले असून 14 रूग्ण बरे झाले.सक्रिय रुग्ण संख्या 52 झाली आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.42 टक्के आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

Theft In Bodgeshwar Temple: बोडगेश्वर मंदिरात पुन्हा मोठी चोरी; फंडपेटी फोडून 12 लाखांची रोकड लंपास

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

SCROLL FOR NEXT