Goa Car ACcident Dainik Gomantak
गोवा

Nag Panchami 2023: नागपंचमी साजरी करून घरी परतणारे दाम्पत्य जखमी; दरीत कोसळली कार

निरंकाल येथे अपघात

दैनिक गोमन्तक

Self Accident Reported aAt Nirankal-Dabal: नागपंचमी साजरी करून वास्को येथे आपल्या निवासस्थानी जात असताना निरंकाल येथे उतरणीवर कार दरीत कोसळण्याची घटना घडली.

या अपघातात निरंकाल-कुंभारवाडा येथील विठ्ठल खांडेपारकर (७२) त्यांची पत्नी संगीता खांडेपारकर (६६) हे दोघेही जखमी झाले. विठ्ठल यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, विठ्ठल खांडेपारकर हे वास्को येथे कामानिमित्त राहतात. सोमवारी ते आणि त्यांची पत्नी नागपंचमी साजरी करण्यासाठी कुंभारवाडा या मूळ गावी गेले होते. सायंकाळी वास्को येथे जात असता निरंकाल येथे उतरणीवर असलेल्या उजव्या बाजूला असलेल्या ढिगाऱ्याला धडक दिली.

या धडकेत गाडीच्या बंपर तुटला तसेच चालकाच्या बाजूला असलेला भाग चक्काचूर झाला. गाडी रिव्हर्समध्ये जाऊन दरीत कोसळली. त्यामुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिकांनी त्यांना गाडीतून बाहेर काढले.

उपचारांसाठी फोंडा उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये नेले. विठ्ठल खांडेपारकर यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बांबोळी येथे तर संगीता यांच्यावर फोंडा येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

रस्ता अरुंद व वळणाचा

निरंकाल ते बेतोडापर्यंतचा हा रस्ता अतिशय अरुंद आणि वळणाचा आहे. चढती आणि उतरणी अधिक असल्याने तो धोकादायक ठरलेला आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असतात.

हा रस्ताचे रुंदीकरण होणे आवश्यक असून सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थ संजय गावकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

Oracle Layoffs 2026: सकाळी 6 वाजता मेल आला अन् नोकरी गेली! ओरॅकलने पुन्हा दिला कर्मचाऱ्यांना नारळ; टेक कंपन्यांमध्ये चाललंय तरी काय?

Viral Video: ना धड इंग्रजी बोलता येईना, ना वाचता येईना! पाकिस्तानी आमदाराचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

Pakistani Cosmetic Creams: तुम्हीही गोरेपणासाठी 'ही' क्रीम वापरताय का? 2 पाकिस्तानी सौंदर्य उत्पादनांवर मोठी कारवाई; भारतीय ग्राहकांची होतेय फसवणूक

"माझी पत्नीही ओरडायला लागली..."; वैभव सूर्यवंशीला संघातून बाहेर, दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर पारा चढला...

SCROLL FOR NEXT