Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपती आजपासून गोवा दौऱ्यावर; काही रस्त्यांवर वाहतुकीसाठी निर्बंध

जय्यत तयारी : कडक पोलिस बंदोबस्त
President Droupadi Murmu Goa Visit
President Droupadi Murmu Goa VisitDainik Gomantak
Published on
Updated on

President Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू मंगळवारपासून (ता.22) प्रथमच तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान त्या विद्यापीठ पदवीदान सोहळा, विधानसभा सदस्यांना मार्गदर्शन आणि वारसा स्थळांना भेटी देतील.

या दौऱ्यासाठी राज्य प्रशासनाने जय्यत तयारी केली असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यासाठी अनेक रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकीसाठी निर्बंध घातले असून काही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी अनेक ठिकाणी स्वागत फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

President Droupadi Murmu Goa Visit
Goa Police: गोवा सरकार व पोलिस ज्‍येष्‍ठांचे संरक्षण व तब्येतीची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर...

राष्ट्रपती मुर्मू मंगळवारी दुपारी राज्यात दाखल होतील. दरम्यान, राष्ट्रपती आझाद मैदानावर जाऊन शहीद स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर त्या राजभवनाकडे रवाना होतील. तिथेच त्यांचा मुक्काम असेल.

मंगळवार, २२ रोजी राष्ट्रपती गोवा येथील राजभवन येथे त्यांच्या सन्मानार्थ गोवा सरकारने आयोजित केलेल्या नागरी सत्काराला उपस्थित राहतील. याप्रसंगी त्या निवडक लाभार्थ्यांना वन हक्क कायद्यांतर्गत ‘सनद’ वाटपही करणार आहेत.

राष्ट्रपती बुधवार, २३ रोजी सकाळी गोवा विद्यापीठाच्या ३४व्या पदवीदान सोहळ्याला उपस्थिती लावतील. सायंकाळी ४ वाजता विधानसभेच्या विशेष कार्यक्रमात सहभाग नोंदवतील. यावेळी त्या विधानसभा सदस्यांना मार्गदर्शनही करतील. तसेच सायंकाळी त्या राज्यातील काही मान्यवरांच्या भेटीगाठी घेतील.

ड्रोन वापरावर बंदी

राष्ट्रपतींचा तीन दिवस राजभवन परिसरात मुक्काम असणार आहे. त्यामुळे मांडवी नदी, अरबी समुद्राचा राजभवन परिसर आणि झुआरी नदीमध्ये जलवाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

यादरम्यान या संपूर्ण परिसरात ड्रोन वापरावर बंदी असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असेल. दोनापावला या पर्यटनस्थळावर पर्यटकांना जाण्यावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत.

Traffic advisory
Traffic advisoryDainik Gomantak
President Droupadi Murmu Goa Visit
Goa Politics: 2024 पूर्वी आरक्षण न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

येथे वाहतुकीसाठी निर्बंध

यादरम्यान मंगळवारी दाबोळी विमानतळ-बांबोळी-दोना पावला-मिरामार-बांदोडकर सर्कलपर्यंतच्या रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

बुधवारी राजभवन ते बांबोळी (गोवा विद्यापीठ)-पर्वरी (विधानसभा संकुल) तर गुरुवारी राजभवन-बांबोळी-मेरशी जंक्शन-जीव्हीएम सर्कल फोंडा- बोरी ब्रीज-आयडीसी वेर्णा ते दाबोळी विमानतळापर्यंतच्या रस्त्यांवरही वाहतुकीसाठी निर्बंध असतील.

२४ रोजी रवाना होतील

२४ रोजी सकाळी राष्ट्रपती राज्यातील काही वारसास्थळांना भेट देऊन दिल्लीकडे रवाना होतील. त्यांच्या या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी राज्य प्रशासनाने जय्यत तयारी केली असून पोलिस दलाच्या वतीने राज्यभरात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

तीन दिवस अतिमहनीय व्यक्ती राज्यात असल्याने यादरम्यान सरकारचे वरिष्ठ आयएएस अधिकारी, विविध खात्यांचे सचिव, खातेप्रमुख तसेच महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या.

शाळांना सुट्टी द्या

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या गोवा भेटीच्या पार्श्वभूमीवर अनेक रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पणजी, पर्वरी, वास्को आणि फोंडा परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

कारण यादरम्यान विद्यार्थी शाळांसाठी कसा प्रवास करणार? पोलिसांकडून सुरक्षेचे कारण देत निश्चित निर्बंध घालण्यात आलेल्या वेळाही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. शिवाय यादरम्यान स्कूल बस आणि विद्यार्थी असणाऱ्या बसेस यांनाही यातून वगळण्यात आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com