Arambol Car Fire Dainik Gomantak
गोवा

Arambol Car Fire: हरमल-मांद्रे येथे चारचाकीला भीषण आग

सुदैवाने या आगीत कोणत्याही जीवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात आलेय.

गोमन्तक डिजिटल टीम

Car On Fire In Arambol हरमल मांद्रे सीमेवर पार्क करून ठेवलेल्या एका चारचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली. सुदैवाने या आगीत कोणत्याही जीवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात आलेय.

सदर आग कशी लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाहीय. आग लागल्याचे समजताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आल. मात्र त्यापूर्वीच ही चारचाकी पूर्णतः जाळून खाक झाली होती.

ही चारचाकी पूर्णतः जळाल्याने आणि गाडीची नंबरप्लेट नष्ट झाल्याने ही गाडी कुणाची होती याची माहिती मिळू शकली नाही. सदर गाडीचा काही दिवसांपूर्वी अपघात घडला असून ती कित्येक दिवस तशीच रस्त्याच्या शेजारी उभी करून ठेवली असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाहीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT