Arambol Beach Dainik Gomantak
गोवा

Arambol News: हरमलमध्ये पोलिसांची धडक मोहिम! पर्यटकांना त्रास देणाऱ्या चार विक्रेत्यांना अटक

Goa police action against Lamani & Nigerian vendors: पर्यटकांना त्रास देणाऱ्या लमाणी व नायजेरीयन बेकायदा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली. चार विक्रेत्यांना ताब्यात घेतले. पर्यटकांना सतावल्यास यापुढे कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी त्या विक्रेत्यांना दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

हरमल: येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना त्रास देणाऱ्या लमाणी व नायजेरीयन बेकायदा विक्रेत्यांवर काल रात्री ९ वाजता पोलिसांनी कारवाई केली. चार विक्रेत्यांना ताब्यात घेतले. पर्यटकांना सतावल्यास यापुढे कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी त्या विक्रेत्यांना दिला.

नायजेरीयन युवतीच्या अतीवावरामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी आमदार जीत आरोलकर यांच्या कार्यालयात पोचल्या होत्या. आमदार कार्यालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी विशेष पथक पाठवून नायजेरीयन युवतींना ताब्यात घेण्यास मोहीम राबवली. त्यामुळे काही प्रमाणात येथील किनाऱ्यावर पर्यटकांना सतावण्याचे प्रकार कमी झाले आहेत.

किनारी भागात पर्यटकांना सतावणाऱ्या लमाणी विक्रेत्यांमुळे देशी-विदेशी पर्यटक नेहमीच त्रस्त दिसून येतात. पार्किंगच्या जागेत गाड्यातून उतरण्यापूर्वी लमाणी महिला आपल्याकडील वस्तू खरेदीसाठी आग्रह करतात. त्यामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो, असे माजी पंच प्रविण वायगंणकर यांनी सांगितले.

पर्यटकांना नेहमी होणारा त्रास कमी होण्यासाठी मांद्रे पोलिस निरीक्षक शेरीफ यांनी पोलिस गस्त वाढवावी, धरपकड मोहीम तीव्र राबवावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

पंचायतीकडून सोपो?

दरवर्षी पंचायत क्षेत्रात सोपो वसुली केली जाते. यंदा सोपो वसुलीची पावणीत आठ लाख बोली लागल्याने आश्चर्य व्यक्त केले. मात्र ह्यात किनाऱ्यावर लमाणी, मसाजवाले, आइस्क्रीम सायकली व स्थानिक शहाळी विकणाऱ्या व्यावसायिकांकडून सोपो वसुली केली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नियमानुसार समुद्र किनाऱ्यावर सोपो घेता येत नाही, परंतु या ठिकाणी सोपो जमा केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

SCROLL FOR NEXT