Arambol News: बेकायदा बांधकामांना न्यायालयाचा दणका! हरमलमध्‍ये पंधरापेक्षा जास्त बांधकामे पाडण्‍यास प्रारंभ

Illegal Constructions: भरतीरेषेपासून २०० मीटरच्या आत केलेली बेकायदेशीर बांधकामे सीआरझेड विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार जमीनदोस्‍त करण्‍यास सुरूवात केली
CRZ Violation: भरतीरेषेपासून २०० मीटरच्या आत केलेली बेकायदेशीर बांधकामे सीआरझेड विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार जमीनदोस्‍त करण्‍यास सुरूवात केली
Arambol Illegal Construction Demolition Dainik Gomantak
Published on
Updated on

Arambol Illegal Constructions Demolition

मोरजी: हरमल पंचायत क्षेत्रात सीआरझेडचे उल्लंघन करून भरतीरेषेपासून २०० मीटरच्या आत केलेली बेकायदेशीर बांधकामे सीआरझेड विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार जमीनदोस्‍त करण्‍यास सुरूवात केली.

एका बाजूने अनंत चतुर्दशीनिमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाची जय्यत तयारी आणि सगळे गणेशभक्त आपल्या लाडक्या ‘बाप्‍पा’ला निरोप देण्याची तयारी सकाळपासून करत असतानाच, सीआरझेड विभागाने आज हरमल (Arambol) पंचायत क्षेत्रातील सीआरझेडचे (CRZ) उल्लंघन करून उभारलेली पंधरापेक्षा जास्त बांधकामे पाडण्‍यास प्रारंभ केला.

गिरकरवाडा-हरमल येथील नाथालिना फर्नांडिस व फेलिक्स फर्नांडिस यांच्‍या मालकीच्‍या बांधकामांचा त्‍यात समावेश आहे. ही बांधकामे मोडण्यासाठी पेडणे तालुका मामलेदार हे पोलिस फौजफाट्यासह मोठ्या संख्येने किनारी भागात उपस्थित होते.

मुख्‍यमंत्र्यांचे आश्‍‍वासनही गेले ‘पाण्‍यात’

एका बाजूने पर्यटन व्यवसाय वाढीस लागावा यासाठी निवडणुकीच्या काळात स्थानिकांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने दिली जातात. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या बांधकाम व्यावसायिकांना ही बांधकामे वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु गणेश चतुर्थी संपण्यापूर्वीच अनंत चतुर्दशीचा मुहूर्त साधून बांधकामे मोडण्यास सुरूवात करण्‍यात आली आहे. त्यामुळे हरमल परिसरात खळबळ माजली आहे.

CRZ Violation: भरतीरेषेपासून २०० मीटरच्या आत केलेली बेकायदेशीर बांधकामे सीआरझेड विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार जमीनदोस्‍त करण्‍यास सुरूवात केली
St. Inez Building Demolition: सांतिनेज येथील जीर्ण इमारत पाडण्याच्या कामाला गती; शेजारच्या घराचे नुकसान

पूर्ण यंत्रणाच तैनात

बांधकामे मोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, जेसीपी यंत्रणा, पंधरा मजुरांची टीम, एक ट्रक घटनास्थळी तैनात होता. इशारा मिळताच मजुरांनी बांधकामे मोडण्यास सुरुवात केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com