North Goa Police  Dainik Gomantak
गोवा

एक, दोन नव्हे एका दुचाकीवर चार शाळकरी मुले चालली सुसाट... व्हिडिओ आला आणि पोलिसांनी दाखवला हिसका

माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळीकर यांनी एका दुचाकीवरून चार शाळकरी विद्यार्थी भरधाव वेगाने जात असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Pramod Yadav

गोव्यात वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत. अपघातांमध्ये दुचाकी अपघतांची संख्या अधिक आहे. अशात काही अपघातांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग देखील दिसून आला आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांचा दुचाकी चालविण्यात सहभाग दिसून आल्यास सक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर उत्तर गोवा पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी कारवाई केली आहे.

माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळीकर यांनी एका दुचाकीवरून चार शाळकरी विद्यार्थी भरधाव वेगाने जात असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात दुचाकीवरील एकानेही हेल्मेट घातलेले नाही. शिवाय विनापरवाना दुचाकी चालवत असल्याचे दिसत आहे. कुंकळ्ळीकर यांनी हा व्हिडिओ उत्तर गोवा पोलिसांना टॅग केला आहे. "अपघातांना आपण सरकारला दोषी धरतो पालक देखील तेवढेच जबाबदार नाहीत का?" असे ट्विट कुंकळ्ळीकर यांनी केले आहे.

दरम्यान, उत्तर गोवा पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत, त्यांना शोधून काढत वाहन नियम 194D आणि 194C अंतर्गत कारवाई केली आहे. तसेच, दंड देखील ठोठावला आहे.

याबाबतचे ट्विट उत्तर गोवा पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत असताना, प्रशासन आणि सरकार देखील सतर्क झाले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाई करत आहे. तसेच, अल्पवयीन मुलांकडे वाहन न देण्याचे आवाहन केले. शिवाय असे केल्यास वाहन मालकाविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT