Dutch tourist attack in Goa : उत्तराखंडच्या तरुणाविरोधात सोशल मीडियावर संताप, 'परप्रांतीय कामगारांवर गोव्यात बंदी हवी'

मोरजी येथील रिसॉर्टमध्ये एका परदेशी पर्यटक युवतीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला
Dutch tourist attack in Goa
Dutch tourist attack in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Dutch tourist attack in Goa: मोरजी येथील रिसॉर्टमध्ये एका परदेशी पर्यटक युवतीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रिसॉर्टमध्येच काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराने हा प्रकार केला आहे. पोलिसांनी संशयित अभिषेक वर्मा (वय 27) याला अटक केली असून, तो मूळचा देहरादून (उत्तराखंड) येथील आहे. त्याच्याकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे. पर्यटक युवती ही मूळची नेदरलँडची आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर सोशल मिडियावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. "गोवा सरकार परराज्यातून येणाऱ्या कामगारांवर बंदी का घालत नाही? ते दररोज गुन्हे करतात. त्यांची गरजच का आहे? राज्यात पुरेसे कामगार नाहीत का?" असे एक नेटकऱ्यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Dutch tourist attack in Goa
Dutch tourist attack in GoaDainik Gomantak
Dutch tourist attack in Goa
Morjim Crime : विदेशी महिलेचा विनयभंग; खुनाचा प्रयत्न

"परदेशी नागरिकांना त्रास देणाऱ्याविरोधात सक्त कारवाई घ्यायला हवी. अशा अशिक्षित लोकांना लाथ मारून गोव्यातून बाहेर हकलून द्यायला हवे." असे एका सोशल मिडिया युझरने म्हटले आहे.

Dutch tourist attack in Goa
Dutch tourist attack in GoaDainik Gomantak

तर, "स्थालांतरित दोषी आहेत." असे मत एकाने व्यक्त केले आहे.

Dutch tourist attack in Goa
Dutch tourist attack in GoaDainik Gomantak
Dutch tourist attack in Goa
Dutch tourist attack in GoaDainik Gomantak

दरम्यान, याप्रकरणात महिलेची आरडाओरड ऐकून युरेका डायस हा तिच्या मदतीला धावला. यावेळी आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला करून तेथून पळ काढला.

नेटकऱ्यांनी युरेका डायस याचे अभिनंदन केले आहे. "महिलेचा जीव वाचविणाऱ्या डायसला सलाम, तो लवकरात लवकर बरा व्हावा आणि त्याला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा," अशा शब्दात एकाने डायस यांचे कौतुक केले आहे.

Dutch tourist attack in Goa
Goa Assembly Session: नेदरलँडच्या युवतीला वाचवणाऱ्या गोमंतकीय युवकाला मुख्यमंत्र्यांनी घोषित केला पुरस्कार

पेडणेतील या धक्कादायक प्रकारातील संशयित आरोपीला अटक केली आहे. युरेका जॉन डायस याने संबंधित युवतीला वाचवले. त्याचे कौतूक आहे. महिलेला वाचवल्याबद्दल त्याचे मी अभिनंदन करतो. आणि त्याला सरकारतर्फे बक्षीस दिले जाईल. असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत उद्गार काढले.

युरेका डायस याचा येत्या 15 ऑगस्ट रोजी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com